आम्ही ठरवू तोच उमेदवार निवडून आणू : मंगलदास बांदल

Image may contain: 7 people, people smiling, people sitting and indoorशिरुर, ता.४ ऑक्टोबर २०१९ (सतीश केदारी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही याचे मला दु:ख नाही. परंतु, विश्वासात घेण्याइतकी ही पाञता माझी नाही का? असा खडा सवाल जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पञकारपरिषदेत केला तर आम्ही ठरवू तोच उमेदवार निवडून आणू असा विश्वास जि.प.चे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी व्यक्त केला.

जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांनी व माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी शुक्रवारी (दि.४) रोजी दुपारी दीड वाजणेच्या सुमारास निवडणूक विशेष कक्षात येत निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्याकडे अपक्ष उमेदवार म्हणुन अर्ज सादर केला. यानंतर पञकारांशी वार्तालाप केला.

यावेळी बोलताना कंद म्हणाले कि, मी गेल्या २० वर्षांपासुन पक्षाशी एकनिष्ठ आहे.पक्षबांधणीसाठी वेळोवेळी काम केलयं. मला उमेदवारी मिळाली नाही याचे यत्किंचितही दु:ख नाही. परंतु पक्षाने मला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं.इतकीही माझी पाञता नाही का ? निर्णय घेताना मला विश्वासात घ्यायला हवं हीच माझी अपेक्षा आहे.

मी, शिरुर हवेली असा भेद कधीच केला नाही.उमेदवारीबाबत निकष काय असा सवाल करत नेमकं मी कुठं कमी पडलो.नेत्यांनी सार्वजनिक माझ्याबाबतीत उमेदवारी का दिली नाही ते जनतेला सांगावं.

मी पक्षाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सोपविला आहे.परंतु राजकिय पर्यायासाठी राजीनामा दिला नाही. मी कधीच अपेक्षा केली नाही. परंतु एका  घरात जि.प.चे सभापतीपद, चेअरमन पद असं सगळं असताना आम्हांला का संधी नको असा सवाल करत सणसवाडी येथील मेळाव्यात जाणुनबुजुन मला अशोक पवार यांनी भाषण करु दिला नसल्याचा आरोपही कंद यांनी केला. पुढील दिशा ही ज्येष्ठ मंडळी,वडीलधारे, तरुण व सर्वांना विचारात  घेउन ठरवु माञ माञ माझं काय चुकलं हे मला कळालं पाहिजं असेही ते म्हणाले.मतदान टक्के वाढीसाठी मी शिरुर हवेलीत वाहनांद्वारे प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

यावेळी जि.प.चे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी शिरुर आंबेगाव बाबत बोलताना सांगितले कि, माझा शिरुर आंबेगाव मध्ये सातत्याने संपर्क आला त्यामुळे शिरुर आंबेगाव साठी मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभेला खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी पक्षाने माझ्यापुढे पायघड्या घातल्याने मीही शब्द खरा करुन दाखवत मोठ्या ताकदीने कोल्हे यांना निवडुन आणण्यासाठी प्रयत्न केला.पक्षाने मला प्रदेश उपाध्यक्षपद देत इनाम दिला होता.मी कधी कोणा पक्षाच्या दारात गेलो नाही माञ मला निष्ठा विचारणा-यांनी स्वत:ची निष्ठा माञ तपासुन पहावी.मी ठरवुन आणलं अन कोल्हे निवडुन आले तसं शिरुर हवेलीत आम्ही ठरवु तोच उमेदवार निवडुन आणु असा विश्वास बांदल यांनी व्यक्त केला. जि.पचे गट बदलुन निवडून येणारा मी आहे. दुस-या मतदारसंघात जाउन उमेदवारी लढवण्यासाठी हिंमत करणारा मी आहे. समोरच्या उमेदवाराने हिंमत असेल तर दुस-या मतदारसंघात उभं राहण्याचं धाडस करावं.

प्रदिप कंदांना उमेदवारी मिळाली तर हेच आमदार होणार असे सांगत याविषयी अधिक ७ तारखेनंतर अधिक बोलु असे बांदल यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या