जांबुत येथे बिबटयाच्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु

Image may contain: 1 person, smiling, standingजांबुत,ता.७ अॉक्टोबर २०१९(प्रतिनीधी) : जांबुत (ता.शिरूर) येथील जोरी लवण वस्ती येथे बिबट्याने  दोन वर्षाच्या मुलीवर हल्ला केल्याने या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

Image may contain: 6 people, people smiling, crowd, shoes and outdoorयाबाबत सविस्तर असे कि,जांबुत येथील जोरी लवण वस्ती येथे रविवारी राञी अचानक बिबट्याने समृद्धी योगेश जोरी या चिमुरडीवर हल्ला करत उचलून नेले.त्यानंतर या भागातील सर्व ग्रामस्थांनी त्या मुलीची शोधाशोध केली.साधारण दोन तास शोधशोध केल्याने त्या मुलीचा मृतदेह सापडला.चिमुकली वर बिबट्यांने हल्ला करून ठार करण्यांची दुःखद घटना घडल्याने या भागातून हळहळ व्यक्त होत आहे.घटनेची वार्ता कळताच घटनास्थळी मोठया प्रमाणात ग्रामस्थ जमले होते.

या घटनेला वनविभाग जबाबदार असुन वेळो वेळी अधिकाऱ्यांना सांगुन सुद्धा कोणतीही उपाय योजना केली जात नाही. त्यामुळे परीसरात तीन ते चार लोकांना बिबटयाच्या हल्याला वारंवार सामोरे जावे लागत असल्याने अनेक ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या