मांडवगणला विजयादशमीनिमित्त १५ फुटी रावणाचे केले दहन

Image may contain: 1 person, standing, sky, crowd and outdoorमांडवगण फराटा, ता. ८ ऑक्टोबर २०१९(प्रतिनीधी): मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या उपस्थित महागाई, भ्रष्टाचार, रोगराई रुपी रावणाचे दहन करण्यात आले.
 
विजयादशमीनिमित्त ग्रामदैवत श्री वाघेश्वर मंदिरातून सासन काठ्यांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती. येथील सरपंच शिवाजीराव कदम यांच्या हस्ते हेमंत पाटील फराटे यांना मानाचा फेटा बांधून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. मांडवगण फराटा येथील मारुती भैरवनाथ सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे १५ फूट उंचीची रावणाची प्रतिकृती बनविली होती.

याप्रसंगी पुणे जिल्हा भाजपा किसान सेलचे अध्यक्ष दादा पाटील फराटे, राजीव पाटील फराटे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकर फराटे, माजी संचालक बाळासाहेब फराटे, बाबा पाटील फराटे, दत्तात्रय फराटे, प्रकाश भोईटे, दीपक पाटील फराटे, सुभाष पाटील फराटे, आत्माराम फराटे, बाबासाहेब फराटे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या