शिक्रापूरच्या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह लोणीकंद हद्दीत

Image may contain: 1 person, smiling, standing and outdoorशिक्रापूर, ता.११ ऑक्टोबर २०१९ (प्रतिनीधी) : शिक्रापूर येथील बेपत्ता व्यावसायिकाचा मृतदेह लोणीकंद हद्दीत दोरीने बांधुन मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे आहे.

याबाबत सविस्तर हकिकत  अशी कि,हनुमंत ऐवळे (रा.विरोळे वस्ती, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे; मूळ रा. करंडवाडी ता. वाळवा, जि. सांगली) हा इसम बेपत्ता झाला असल्याची घटना घडली होती. याबाबत गणेश प्रकाश धुमाळ (रा. पिंपळे खालसा, मुक्ताईनगर, ता. शिरूर, जि पुणे) याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. असताना त्याचा शोध शिक्रापूर पोलिसांच्या मार्फत सुरु होता. तपासा दरम्यान लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बुर्केगाव (ता. हवेली) येथील वनविभागाच्या जवळ असलेल्या भीमानदीच्या पात्रात एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. यावेळी बुर्केगावचे पोलीस पाटील दादा दशरथ कुंभार यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे खबर दिली असताना लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असताना त्यांना त्या ठिकाणी एका इसमाचा हात पाय बांधलेल्या व गळ्यात दगड बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

यावेळी पोलिसांनी परिसरातील बेपत्ता इसमाची माहिती घेत असताना  शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बेपत्ता इसमाबाबत माहिती मिळाली. त्यावेळी बेपत्ता हनुमंत ऐवळेच्या नातेवाइकांना माहिती देत सदर मृतदेह दाखविला असताना हनुमंत ऐवळेच्या नातेवाईकांनी सदर मृतदेह हनुमंतचा असल्याचे सांगितले. याबाबत पोलीस पाटील दादा दशरथ कुंभार (रा.बुर्केगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने लोणीकंद पोलिसांनी आकस्मात मयत प्रकरणी नोंद केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दगडू हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन गिलबिले हे करत आहे.  शिक्रापूर येथून बेपत्ता झालेल्या हनुमंत ऐवळे या इसमाचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळून आला त्यावरून सदर इसमाचा घातपात झाला असावा अशी परिसरात चर्चा असून तापसाअंती काय निष्पन्न होणार  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या