Video : मुख्यमंत्र्यांची आश्‍वासने लबाडाघरचे आवतणः शरद पवार

Image may contain: 7 people, people smiling, glasses
उरुळी कांचन, ता. 11 ऑक्टोबर 2019 (तेजस फडके): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरूर तालुक्‍यात आले असता यशवंत सहकारी साखर कारखाना शंभर दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. पाच वर्षे उलटूनही, कारखाना सुरू होऊ शकलेला नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करून तीन वर्षांचा कालावधी उलटलेला आहे. अभ्यास सुरू असल्याच्या नावाखाली तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना झुलवत ठेवले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवतण ठरल्याची टीका माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.

शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार ऍड. अशोक पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजारमैदानात शुक्रवारी (ता. 11) जाहीर सभा झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे होते. या वेळी उमेदवार ऍड. अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, देविदास भन्साळी, प्रा. के. डी. कांचन, प्रताप गायकवाड, माधव काळभोर, प्रकाश म्हस्के, माणिकराव गोते, राजाराम कांचन, सूर्यकांत गवळी, दिलीप वाल्हेकर, रवी काळे, सुजाता पवार, जितेंद्र बडेकर, कीर्ती कांचन, हेमलता बडेकर, युगंधर काळभोर, विकास लवांडे, राजेंद्र कांचन, देविदास कांचन, अमित कांचन, सागर कांचन, संतोष कांचन, लोचन शिवले, राजेंद्र चौधरी, अण्णा महाडिक, कांतिलाल काळे, सुभाष टिळेकर, अर्जुन कांचन, योगेश शितोळे, प्रदीप वसंत कंद उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक उद्योगधंदे बंद पडू लागले आहेत. कामगार व त्यांची कुटुंबे देशोधडीला लागली आहेत. तरुणांच्या हातांना काम नसल्याने नैराश्‍य वाढत आहे. शेतकरी, कामगार, उद्योजक अशा सर्वांना अडचणीत टाकणाऱ्या सरकारला खाली उतरवण्याची गरज आहे.'

Image may contain: 11 people, people on stage and people standing
भाजप सरकारकडून सर्वसामान्यांची केवळ दिशाभूलच
राज्यघटनेतील कलम ३७१ मुळे ईशान्येकडील राज्यांत जमीन-घर खरेदी करता येत नाही. हे अनुच्छेद रद्द करा, त्यास आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारला लगावला.

उरळीकांचन येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर-हवेली विधानसभेचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, संसदेने  कलम ३७० रद्द केले. त्यावर भाजपचे नेते आम्हाला विचारतात, तुमचे मत काय आहे? संसदेत  रद्द करताना केवळ चार-पाच सदस्यांचा विरोध होता. कारण या संदर्भातील निर्णय घेताना काश्मीरच्या लोकांना विश्वासात घ्या, एवढीच त्यांची मागणी होती; परंतु राज्यकर्ते लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काय केले हे न सांगता ३७० करून विरोधकांवर टीका करीत आहेत. ३७० रद्द झाल्याने काश्मीरमध्ये घर, जमीन खरेदी करता येते. याचे आम्ही स्वागत करतो. पण ३७१ अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरेदी करता येत नाही.हा  कलम रद्द करत  असाल तर त्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण हे सरकार ३७१ संदर्भात काहीही करायला तयार नाही. त्याचे कारण एकच आहे. ३७०च्या नावाने, पुलवामाच्या नावाने त्यांनी लोकांची दिशाभूल चालवली आहे.काश्मीर मध्ये आपल्यापैकी कोण जमीन खरेदी करणारा आहे का  असे उपस्थितांना विचारताच एकच हशा पिकला.

यावेळी शिरुर-हवेली १९८ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या