Video: पाचर्णे यांनी दत्तक घेतलेल्या रस्त्याची चाळण

Image may contain: 2 people, people standing and outdoor
वढु बुद्रुक, ता. 12 ऑक्टोबर 2019 (तेजस फडके): आमदार बाबूराव पाचर्णे हे प्रचार सभांमधुन कोट्यवधी रुपयांची विकास कामे केल्याचे सांगत आहेत. परंतु, त्यांनीच दत्तक घेतलेल्या शिरुर तालुक्यातील संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या "वढु-बुद्रुक" गावात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, गावचा विकास हरवला आहे. विद्यमान आमदारांनी गावासाठी एकही रुपयाचा निधी दिलेला नसल्याचे ग्रामस्थांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.

वढु-बुद्रुक या गावाला ऐतिहासिक महत्व असून छत्रपती संभाजी महाराज यांची येथे समाधी आहे. दरवर्षी लाखो शिवभक्त आणि पर्यटक या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीला भेट देण्यासाठी येतात. या ठिकाणी औद्योगिक वसाहत आहे. तसेच माहेर हि अनाथ मुलांची संस्था, KEM हॉस्पिटल सुद्धा आहे. आमदार बाबूराव पाचर्णे यांनी हे गाव दत्तक घेतल होत. परंतु, या गावाचा विकास नक्की झालाय का..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे-अहमदनगर रस्त्यापासून सुमारे ४ किमी हे गाव आहे. दरवर्षी येथे संभाजी महाराजांच्या समधीच दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात.

पुणे-अहमदनगर रस्त्यावर कोरेगाव भीमा हे गाव आहे. कोरेगाव भीमा पासुन वढु-बुद्रुक अंदाजे ४ किमी आहे. कोरेगाव भीमा ते वढु-बुद्रुक या रस्त्यावर प्रचंड मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. पाऊस पडल्यानंतर या खड्डयात पाणी साठल्याने खड्याचा अंदाज येत नसल्याने आत्तापर्यंत अनेकजण या खड्यात पडून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. दोन दिवसांपुर्वी योगेश भंडारे नावाचा युवक असाच खड्याचा अंदाज न आल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे जर आमदारांना स्वतः दत्तक घेतलेल्याच गावाचा विकास करता येत नसेल तर ते तालुक्याचा विकास करणार का..? असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे.

दरम्यान, शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु असून विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे विरुध्द माजी आमदार अशोक पवार अशी तुल्यबळ लढत होणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या