हॉटेल एस नाइन आणि एस के ग्रुपवतीने मैफिलीचा नजराणा...

Image may contain: textरांजणगाव गणपती, ता. 13 ऑक्टोबर 2019 (तेजस फडके): कोजागिरी संध्येनिमित्त येथे हॉटेल एस नाइन आणि एस के ग्रुप यांच्या वतीने या ग्रुपचे सर्वेसर्वा संदीप कुटे यांनी सुगम संगीत व हिंदी गजल मैफिलीचा नजराणा निसर्गाच्या सानिध्यात आयोजित केला आहे. येणाऱ्या सर्व खवय्यांसाठी या सुगम संगीत आणि गजल मैफिलीचा नजराणा सतत सुरू ठेवण्यासाठी पहिलीच वेळ संपूर्ण परिसरात प्रथमच याठिकाणी सुरू होतेय.

रांजणगाव गणपती येथे प्रथमच कोजागिरी संध्याचे आयोजन होत असल्याने पंचक्रोशीत या कार्यक्रमाची आतूरता सगळ्यांना लागली आहे. त्यामुळे येणारी कोजागिरी संध्या ही परिसरात अतिउत्साहाने साजरी होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

दरम्यान, कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही अश्विन पौर्णिमेला हिंदू समाजातील सर्व जण साजरा करत असतात. कोजागिरी पौर्णिमा साधारण सप्टेंबरमध्ये अथवा ऑक्टोबर महिन्यात दरवर्षी येते. माणिकेथारी या नावानेही कोजागिरी पौर्णिमेला नाव दिले गेले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या