...अशी बांडगुळे पक्षाबाहेर काढलेली बरी : जयंत पाटील

Image may contain: 1 person, smilingशिरूर, ता.१३ ऑक्टोबर २०१९ (सतीश केदारी) :  ज्यांची शरद पवारांच्या विचारांवर निष्ठा नव्हती अशी बांडगुळे पक्षात ठेवण्या पेक्षा बाहेर काढलेली बरी, मला पक्ष स्वच्छ करायचा आहे अशी टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिरुर येथील सभेत केली.

शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉंग्रेस आयचे उमेदवार माजी आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ येथील कापड बाजारात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांची जाहीर सभा झाली.यावेळी पाटील हे बोलत होते.

यावेळी बोलताना मिटकरी म्हणाले की, खासदार डॉ.अमोल कोल्हे हे संपूर्ण राज्यात प्रचार करीत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी साठी दिल्लीतून पंतप्रधान नरेंद मोदी,गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे प्रचारात आले आहेत. केंद्र शासनाने घेतलेया नोटाबंदीचा परिणाम उद्योग व्यवसायावर झाला आहे. भाजपाच्या वतीने राम कदम यांना तिकीट दिली जाते पण एकनाथ खडसेंना तिकीट दिले जात नाही असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेस शिरूरचा बालेकिल्ला होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  व अमित शहा यांच्या सभांना भाड्याने गर्दी करावी लागते. हे सरकार अधर्मी सरकार आहे असा आरोपही त्यांनी केला.सत्ताधारी विचारतात की शरद पवार यांनी काय केले. त्यांना आमच्या सवाल आहे की कांद्याला बाजारभाव नाही त्याचे काय ? शेतक-यांच्या आत्महत्या झाले त्याचे काय? महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री बोलत नाही.  हे सरकार संवेदनशील शून्य आहे. मुंबई येथील २७०० झाडे आरे मधली कापली. सरकारमधील वाचाळवीरांना तिकिटे दिली.सध्या राष्ट्रवादीला चांगले वातावरण आहे. राज्यातील सर्वात तरुण पक्ष राष्ट्रवादी आहे.राष्ट्रवादी चे सरकार आल्यानंतर ईडीची  चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करावी शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाची चौकशी करावी. त्यानंतर चंद्रकांत पाटील, व नंतर सुधीर मनगुंटीवार यांची करावी असे ते म्हणाले.

विनोद तावडे, किरीट सोमय्या यांची उमेदवारी कापण्यात आली,मित्र पक्ष महादेव जानकर रामदास आठवले यांचे पक्ष भाजपाने संपविले असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.जयंत पाटील म्हणाले की मला अनेक जण विचारातात की पक्षातून अनेक जण बाहेर पडत आहे. मला पक्ष स्वच्छ करायचा आहे.ज्यांनी पक्षाच्या विरोधात उलटे काम केले आहे, त्यांना पक्ष हाकलून देण्याचे काम करेल असे ते म्हणाले.अशोक पवार व त्यांच्या पत्नी सुजाता पवार यांनी चांगले काम केले आहे. छत्रपती संभाजीमहाराज व शिवाजी महाराज यांचे कार्य घरोघरी पोहचविण्याचे काम डॉ.अमोल कोल्हे यांनी केले. शिरूर विधानसभा मतदारसंघाचे उमदेवार अशोक पवार यांनी त्याच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची माहिती दिली.

या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शिरुर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष रवि काळे, पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, दुधसंघाच्या वैशाली नागवडे, शिरुर च्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे, बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे, संचालक विजेंद्र गद्रे, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे, शिरुरचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवकचे तालुकाध्यक्ष सागर निंबाळकर, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, माजी शहराध्यक्ष अमोल चव्हाण, वडगाव रासाईचे सोसायटीचे चेअरमन सचिन पवार आदी यावेळी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या