अमित शहा यांनी जिंकली शिरूरकरांची मने...

Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoorशिरूर, ता.१४ ऑक्टोबर २०१९(सतीश केदारी): शिरुरसारख्या ग्रामीण भागात ते आले..त्यांनी विराट जनसमुदाय पाहिला अन हजारो शिरुरकरांची मने जिंकली ती देशाचे गृहमंञी अमित शहा यांनी.

Image may contain: one or more people, crowd and outdoorन भुतो न भविष्यती अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी, भारत माता कि जय तसेच गुलाबाच्या पुष्पांनी ठिकठिकाणी केलेले स्वागत अशा उत्साही व भगव्यामय वातावरणात,झांजपथकाच्या निनादात, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय गृहमंञी अमित शहा यांचा शिरुर शहरातुन निघालेला भव्य रोड पार पडला.या रोड शो मध्ये शिरुर शहरात हजारो नागरिक भव्य रॅली मध्ये सहभागी झाले होते.या रॅलीला नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.

Image may contain: one or more people, crowd, sky, stadium and outdoorशिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंञी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या शिरुर शहरात रोड शो चे आयोजन करण्यात आले होते.पाबळ फाटा चौफ ते विद्याधाम प्रशाला कॉर्नर या मार्गावर रोड शो आयोजित करण्यात आला होता.पाबळ फाटा पासुन फुलांनी सजवलेल्या रथामध्ये निघालेल्या या भव्य रोड शो मध्ये गृहमंञी अमित शहा यांच्या समवेत भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद,पुणे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे,तालुकाध्यक्ष भगवान शेळके, हवेलीचे तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे,शहराध्यक्ष केशव लोखंडे हे उपस्थित होते.रॅलीच्या अग्रभागी झांजपथक,दुय्यमस्थानी भगवे फेटे परिधान केलेल्या महिला व ताशा पथक व त्यानंतर अमित शहा यांचा रथ शिरुर शहरातुन पाबळफाटा,कृषी उत्पन्न बाजारसमिती,नगरपरिषद कार्यालय,विद्याधाम प्रशाला कॉर्नर असा रोड शो ला झाला.याला सर्वसामान्य नागरिकांचा उत्सुफुर्त प्रतिसाद लाभला.

पाबळ फाटा चौकापासुन निघालेल्या भव्य रॅलीत अमित शहा पाहण्यासाठी नागरिकांनी दुतर्फा गर्दीच गर्दी केली होती.ठिकठिकाणी गुलाबपुष्पांनी शहा यांचे स्वागत करण्यात येत होते.तर फुलांनी सजविलेल्या रथातुन शहा हेही नागरिकांना अभिवादन करत होते.शिरुर शहरातील एसटी बस स्थानक,सवेरा हॉटेल,उंचच उंच इमारतीवर जाउन नागरिक शहा यांना पाहण्यासाठी गर्दी करत होते.प्रत्येक मोठ्या इमारतींवर पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.दुपारी पाच वाजता सुरु झालेली रॅली सुमारे एक तास सुरु होती.सुमारे २५ ते ३० हजार नागरिकांची गर्दी असल्याने ही शिरुर शहरातील रॅली 'न भुतो-न भविष्यती' अशी असल्याची व आजपर्यंतची शिरुर शहरातील गर्दीचा उच्चांक मोडणारी रॅली असल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती. 

पुणे ग्रामीण पोलीसांचा तगडा बंदोबस्त
देशाचे गृहमंञी अमित शहा हे प्रथमच शिरुर शहरात येणार असल्याने दोन दिवसांपासुन तालुक्यात नागरिकांकमध्ये उत्सुकता लागुन राहिली होती.त्याचप्रमाणे शहा यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याने रविवार(दि.१३) रोजी सकाळपासुन पोलीसांचा शहरात चौका-चौकात कडक बंदोबस्त होता.गृहमंञी अमित शहा ज्या ठिकाणी हॅलिकॉप्टर ने उतारणार होते ते हेलिपॅड चे ठिकाण शहरातील जाणा-या मार्गावर पुरुष व महिला पोलीस कर्मचा-यांचा तगडा बंदोबस्त ठेवलेला होता. पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक, पाच उपविभागीय पोलीस अधिकारी, बारा पोलीस निरीक्षक, चाळिस सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक,महिला व पुरुष पोलीस कर्मचारी दोनशे,केंद्रिय राखीव दलाचे जवान १००,राज्य राखीव दलाच्या चार प्लाटुन यांसह दंगल नियंञण पथक,बॉम्ब शोध पथक असा बंदोबस्त देशाचे गृहमंञी अमित शहा यांच्या रोड शो साठी संपुर्ण शहरात तैनात करण्यात आला होता.पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील,पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट, उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा सकाळपासुन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या