कर्डे येथे फसवणूक आणि त्रासामुळे एकाची आत्महत्या

Image may contain: 1 person, textशिरूर, ता. 15 ऑक्टोबर 2019: जमीन खरेदीत फसवणूक झाल्यानंतरही, मूळ जमीन मालकाकडूनच खोटी फिर्याद देऊन मानसिक त्रास दिल्याने तणावातून प्रफुल्ल शांतिलाल लुंकड (वय 55, रा. कर्डे, ता. शिरूर) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 14) पहाटे उघडकीस आली.

मृत लुंकड यांचा मुलगा शशांक यांनी तक्रार दिली आहे. शिरूर पोलिसांनी, दीपक रामदास पाचर्णे, सुधीर रामदास पाचर्णे व रामदास बाजीराव पाचर्णे (तिघे रा. कर्डे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी पाचर्णे यांनी त्यांची दीड एकर जमीन लुंकड यांना 11 लाख रुपयांना विकली होती; परंतु दीड एकरांपैकी एक एकर जमीन पूर्वीच कुणाला तरी विकल्याचे खरेदीखतावेळी लुंकड यांच्या लक्षात आले. त्यामुळे पाचर्णे यांना लुंकड यांनी जाब विचारला. तेव्हा चूक झाल्याचे सांगून त्यांनी काही रकमेचे धनादेश दिले. त्यानंतर लुंकड यांनी उर्वरित पैशाची मागणी केली असता, त्यांनाच दमदाटी केली व त्यांच्यासह मुलावर आणि जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे यांच्याविरुद्ध 7 जुलैला सावकारकीची तक्रार दिली. यानंतरही पाचर्णे हे लुंकड यांना दहा लाख रुपये द्या, नाहीतर तुमचा जामीन रद्द करू, महिलांमार्फत केस करू, अशा धमक्‍या वारंवार देत असल्याने ते तणावाखाली होते.

दरम्यान, सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रफुल्ल लुंकड हे किराणा दुकानात झोपायला गेले. पहाटे अडीचच्या सुमारास त्यांची आई चंचलबाई या जाग्या झाल्या असता, त्यांना प्रफुल्ल न दिसल्याने त्यांनी दुकानाच्या गोदामात पाहिले असता, प्रफुल्ल हे छताच्या अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या