Video: शिरूरमध्ये परिवर्तन अटळ: अशोक पवार

Image may contain: 3 people, people on stage, wedding, child and outdoorशिरूर, ता. 16 ऑक्टोबर 2019 (तेजस फडके): प्रचारानिमित्त मतदारसंघात फिरतान असताना शिरूर व हवेली तालुक्‍यांतील रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर असल्याचे दिसून आले. गेल्या पाच वर्षांत दोन्ही तालुक्‍यांत एकही मोठे विकासकाम झाल्याचे दिसून येत नाही. शिरूरमध्ये परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे उमेदवार, माजी आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केला.
पवार म्हणाले, 'हवेलीतील थेऊरफाटा ते केसनंदमार्गे लोणी कंद या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. उरुळी कांचन ते जेजुरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दोनच दिवसांपूर्वी उरुळीतील एका महिलेला जीव गमवावा लागला. गेल्या पाच वर्षांत दोन्ही तालुक्‍यांत एकही मोठे विकासकाम झाल्याचे दिसून येत नाही. तरीही विद्यमान लोकप्रतिनिधी साडेतीन हजार कोटींच्या गप्पा मारत आहेत. सध्या विद्यमान लोकप्रतिनिधींच्या भोवती गोरगरीब शेतकऱ्यांचे सातबारा खिशात घेऊन फिरणाऱ्यांचा गराडा असून, तेच अशोक पवारला पाडण्याच्या गप्पा मारत आहेत. लॅंड व सॅंड माफिया "अशोक पवार खुनशी राजकारण करतात' असे ओरडत आहेत. गोड बोलून, केवळ अदृश्‍य विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधीला मतदार कंटाळले आहेत. शिरूरमध्ये परिवर्तन अटळ आहे.'

शिरूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांपैकी एकही रस्ता प्रवास करण्याच्या योग्यतेचा राहिलेला नाही. सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पाच वर्षांत मतदारसंघात एकही मोठे विकासकाम अथवा योजना पूर्ण झाल्याचे दिसत नसताना, विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र मतदारांना न दिसणाऱ्या तीन ते साडेहजार कोटींच्या अदृश्‍य विकासकामांच्या गप्पा मारत आहेत. आगामी काळात शिरूर- हवेलीच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे उमेदवार, माजी आमदार अशोक पवार यांनी केले.


पवार म्हणाले, "पुण्यासह राज्यातील सर्वच मोठ्या शहरांत मोठमोठी रुग्णालये सरकारने दिलेल्या जागेवर उभारली आहेत. जागा देताना सरकारने, संबंधित रुग्णालयांत गरीबांना मोफत उपचार देण्याची अट घातली होती. यातूनच 2009 ते 2014 या काळात सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेता आली. गरीब रुग्णांना पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींची मदत मिळवून दिली. शासकीय कोट्यातून उपचार मिळाल्याने, हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचविली. अनेकांना उभे राहण्याची ताकद दिली. आमदार म्हणून पुन्हा संधी दिल्यास, यापुढील काळातही गोरगरीब नागरिकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील राहीन.''

गुनाट, निमोणे, शिंदोडी, गोलेगाव, तरडोबाची वाडी या ठिकाणी अशोक पवार यांनी दौरा केला. यावेळी बोलताना पवार म्हणाले, "मोदींच्या लाटेत निवडून आलेल हे व्यक्तिमत्व असून, शिरुर-हवेलीत विकासाचा बोजवारा उडालेला आहे. विद्यमान आमदारांच्या स्वतःच्या गावात स्मशानभूमीत जायला रस्ता नाही, तो माणूस मतदारसंघाचा काय विकास करणार.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या