भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या हातांना मत देऊ नका : सुधीर फराटे

Image may contain: one or more people and people sittingशिरसगाव काटा, ता.१७ ऑक्टोबर २०१९ (प्रतिनीधी) : घोडगंगा कारखान्यात शेतक-यांची प्रचंड फसवणूक करणा-या भ्रष्टवादी नेत्याला घरी बसवा, अशी घणाघाती टिका घोडगंगा कारखान्याचे संचालक व शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी  केली.

शिरुर हवेलीचे महायुतीचे उमेदवार आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रचारार्थ गावभेट दौ-यानिमित्त फराटे हे बोलत होते. यावेळी फराटे यांनी घोडगंगा कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार अशोक पवार यांच्या कारभरावर सडकुन टिका केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, स्वत:ला कार्यसम्राट म्हणवून घेणा-यांनी राज्यात बायोमेट्रिक सिस्टीम राबविली परंतु सभासदांच्या मालकीच्या घोडगंगा कारखान्यात माञ महत्वाच्या विभागात बायोमेट्रिक करायला विसरले. इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी बाजारभाव देउन घोडगंगा कारखान्याच्या हजारो सभासदांची फसवणुक केली. शेतक-यांना त्यांच्या घामाचा मोबदला का मिळू नये असा सवाल करत कारखान्याचा सभासद प्रत्येक घामाच्या दामाचा बदला घेतल्या शिवाय राहणार नाही.

यावेळी माजी जि.प.सदस्य दादासो कोळपे बोलताना म्हणाले कि, राष्ट्रवादीत असताना प्रदिप कंद हे जि.प.अध्यक्ष असताना समन्यायी निधीचे वाटप करताना जि.प.गटात मोठ्या प्रमाणावर कामे केली. तेवढी कामे विद्यमानांना जि.प.गटात करता नाही आली. प्रत्येकवेळी अपमान सहन केला, जर विरोधात काम केलं असेल तर समोरासमोर चर्चेला यावं असं खुलं आव्हान कोळपे यांनी माजी आमदार अशोक पवार यांना देत यापुढे अपमान सहन करणार नाही, जशास तसेच उत्तर दिलं जाईल असे म्हणत कडाडून टिका केली.

यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल काशिद, कैलास भोसले, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग फराटे, माजी पं.स.सदस्य राम कदम, मानसिंग कदम, माजी सरपंच भरत चव्हाण आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या