माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांचा भाजप प्रवेश

Image may contain: 15 people, people smiling, people standingशिरुर,ता.१८ अॉक्टोबर २०१९(प्रतिनीधी) : न्हावरे-शिरुर ग्रामीण गटातील पं.स.उपसभापती राजेंद्र जासुद यांच्यासह शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी मुख्यमंञ्यांच्या उपस्थितीत भाजपात जाहिर प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

माजी पं.स.उपसभापती राजेंद्र जासुद हे गेल्या अनेक वर्षांपासुन राष्ट्रवादीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणुन ओळखले जात होते.त्यांची करडे,लंघेवाडी व परिसरात व शिरुर ग्रामीण गटात चांगली पकड आहे.परंतु ते गेल्या काही दिवसांपासुन नाराज असल्याने अलिप्त होते.त्यांनी नुकताच आमदार बाबुराव पाचर्णे यांना जाहिर पाठिंबा देत शिरुर तालुक्यात खळबळ उडवुन दिली होती.त्याचप्रमाणे शिरुर पंचायत समितीची निवडणुक लढवलेले शामकांत वर्पे,माजी पंचायत समिती सभापती सिद्धार्थ कदम,राष्ट्रवादीचे माजी पुणेजिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, मराठा महासंघाचे संभाजी कर्डिले,निमोणेचे माजी सरपंच विजय भोस, सरदवाडीचे सरपंच विलास कर्डिले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत नुकताच जाहिर प्रवेश केला.

शिरुर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासुन राष्ट्रवादीत नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाला कंटाळुन अन्य पक्षाची वाट धरली आहे.त्यात शिरुर ग्रामीण गटातील या कार्यकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीला नारळ देत प्रवेश केल्याने आमदार बाबुराव पाचर्णे यांचे पारडे या गटात मजबुत झाले असल्याचे मत राजकिय जाणकारांनी व्यक्त केले आहे.शिरुर तालुक्यात भाजपला अच्छे दिन आले असुन राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या अडचणीत माञ वाढ होउ लागली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या