'त्या' भ्रष्टवादी नेत्याला जनताच धडा शिकवेल: दादा पाटील फराटे

Image may contain: 8 people, people standing and outdoorमांडवगण फराटा, ता.१९ ऑक्टोबर २०१९ (सतीश केदारी) : घोडगंगा कारखान्यातील सभासदांच्या घामाचे पैसे गिळंकृत करुन जनतेच्या पैशावर आमदारकी लढवणा-या चेअरमनला तालुक्यातील जनताच धडा शिकवेल अशी घणाघाती टिका भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी केली.

भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या प्रचारानिमित्त मांडवगण फराटा गावठाण वार्ड क्र १ येथे पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष दादा पाटील फराटे यांच्या नेतृत्वाखाली मतदारांचा भेट दौरा आयोजित केला होता.यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि,घोडगंगा कारखान्यावर विद्यमान अध्यक्षांनी कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवला आहे.माञ आपलं पाप झाकुन सरकारच्याच नावाने बोंबाबोब सुरु आहे.चालु वर्षाच्या एफआरपी साठी राज्यशासनाच्या मेहेरबानीमुळे २५ कोटी उपलब्ध करुन दिले.त्यामुळे घोडगंगा कारखाना एफआरपीची रक्कम देउ शकला.घोडगंगा कारखान्याच्या विद्यमान चेअरमनने स्वत:च्या कारखान्याच्या फायद्यासाठी सभासदांच्या मालकीच्या घोडगंगेची फरफट करुन ठेवली आहे.आमदार बाबुराव पाचर्णे तालुक्यातील प्रत्येक घटकाला सोबत घेउन न्याय द्यायचा प्रयत्न केला असल्याने तालुक्यातील जनता मोठ्या मताधिक्याने पाचर्णे यांनाच निवडुन देइल असा विश्वास फराटे यांनी यावेळी व्यक्त केला.

या मतदार भेट दौ-याला मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला.यावेळी वार्डाचे सदस्य पल्लवी खोमणे,सदस्य सोनाली थोरात,  शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार, रयत क्रांतीचे तालुका अध्यक्ष पांडुरंग फराटे, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक आत्माराम बापू फराटे, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंद तात्या फराटे, बाळकाका फराटे, पंचायत समिती मा.सदस्य लक्ष्मण बापु फराटे, उपसंरपच सुभाष पाटील फराटे,पुण्याई उद्योग समूहाचे अध्यक्ष संभाजी आप्पा फराटे, मांडवगण सोसायटीचे चेअरमन संतोष फराटे, व्हाईस चेअरमन तुकाराम थोरात, छत्रपती सोसायटीचे चेअरमन संभाजीनाना फराटे,प्रभाकर घाडगे,शरद गायकवाड,महादेव फराटे, रावसाहेब जगताप, बाळनाना कोळपे, राजेंद्र दरेकर,मांडवगण फराटा ग्रामपंचायतचे सदस्य सागर नाना फराटे,अशोक जगताप, अमोल जगताप,बिभीषण फराटे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड,सागर वेदपाठक,अमोल शितोळे,योगेश फराटे, सुरेश फराटे,राहुल फराटे, रविंद्र कुंभार,आण्णा थोरात,गणेश माणिक फराटे, मनोज फराटे, रामोशी समाजाचे नेते सुनील खोमणे, मेजर थोरात,पाप्पाभाई अतार, प्रसाद कटारिया, पांडुरंग मोरे, गणेश चव्हाण, रितेश वाळके, मनोज राठोड, विशाल जेजुरकर, मुकेश साठे, माहायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या