Video: मतदान केंद्रावर अधिकारी कसे गेले पाहा...

Image may contain: outdoor, nature and waterतळेगाव ढमढेरे, ता. 21 ऑक्टोबर 2019: शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढरे येथील तांबूळ ओढा, दराखे वस्ती येथील मतदान बुथ क्रमांक 173 वर जाण्यासाठी रस्ता चिखलमय झाल्यामुळे अधिकाऱ्यांना बैलगाडीचा वापर करावा लागला. संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील तांबूळ ओढा आणि दराखे वस्तीवर जाण्यासाठी रस्ताच नाही. रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य आहे. रविवारी (ता. 20) 173 बुथ क्रमांक असलेल्या या मतदान केंद्रावर जाण्यासाठी अधिकाऱ्यांना चक्क बैलगाडीचा वापर करावा लागला.

दरम्यान, या रस्ताबाबतीत नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी देखील केल्या होत्या. या रस्ता संदर्भात स्थानिकांनी गेली 7 ते 8 वर्ष शिरूर तहसील कार्यालयात आणि तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिले आहे. मात्र, यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. याठिकाणी शाळा आहे, लहान मुलांना व ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी खूप हाल सहन करावे लागतात, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या