रांजणगावमध्ये मतदारांवर सवलतीत उपचार सुरू...

रांजणगाव गणपती, ता. 22 ऑक्टोबर 2019 (तेजस फडके): विधानसभा निडणूकीत मतदान केल्यास मतदारांवर सवलतीत उपचार केले जातील, असे आवाहान येथील श्री गजानन हाँस्पिटलचे डॉ. अंकुश लवांडे यांनी केले होते. आवाहनला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून, रुग्ण तपासणी करून घेत आहेत.

रांजणगाव देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. लवांडे यांनी मतदानाविषयी जनजागृती व्हावी व मतदानाचा आकडा वाढवा यासाठी सोशल मीडियावरून मतदारांना आवाहन केले होते. मतदान केलेले दाखवल्यास 20 टक्के सवलत हाँस्पिटल बिलावर व रक्त तपासणीवर दिली जाईल. 21 आँक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2019 पर्यत सवलत असणार आहे, असे आवाहन केले होते. संबंधित पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाली होती.

'शिरूर तालुक्यामध्ये साथीच्या आजाराने अनेकजण आजारी आहेत. मतदानाचा आकडा वाढावा व रुग्णांना सवलतीमध्ये उपचार व्हावेत, म्हणून आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. रुग्ण बोटावर शाई असल्याचे दाखवत आहेत. आवाहानामुळे दुहेरी फायदा होताना दिसत आहे, एकतर मतदानाचा आकडा वाढला व साथीच्या आजाराने आजारी असलेले रुग्ण उपचार घेऊ लागले आहेत,' असे डॉ. लवांडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या