सचिन दरेकर यांच्या कडून गरीब कुटुंबियांना मिठाई वाटप

Image may contain: 10 people, people smilingशिक्रापूर,ता.३० ऑक्टोबर २०१९ (प्रतिनिधी ): करंदी (ता. शिरूर) येथील युवक सचिन दरेकर यांनी करंदीच्या २५० कुटुंबियांना मिठाई वाटप करून दिवाळी साजरी केली. दर वर्षी प्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष सचिन दरेकर यांनी करंदीच्या दोनशे पन्नास कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन फराळ वाटप केला.

मोलमजुरी करून उपजिविका करणाऱ्या करंदीच्या इंदिरा नगर,दलित वस्तीमध्ये राहत असलेल्या गरीब कुटुंबातील सर्वांना मिठाई देऊन दिवाळी साजरी केली.दरेकर नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत गरजू विद्यार्थी, अर्थिक दुर्बल कुटुंब, समाजातील वंचित कुटुंबांना मदत करत असतात त्याच पार्श्वभूमीवर दिवाळीचे औचित्य साधून भाऊबीजेच्या दिवशी या कुटुंबांना मिठाई वाटप करुन समाज्यात एक आदर्श घडवून दिला असल्याचे शरद दरेकर यांनी सांगितले.

यावेळी रमेश दरेकर,योगेश दरेकर,दिनेश दरेकर,विकास दरेकर,पंडित दरेकर,देवराम दरेकर,अजित दरेकर,संतोष दरेकर,मंगेश दरेकर,गणेश दरेकर, शुभम दरेकर,योगेश शिंदे,गिरीश पंचमुख,बाप्पू पंचमुख,ऋषिकेश पंचमुख,प्रकाश पंचमुख,शुभम पंचमुख उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या