कवठे येमाईत सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आरोपी जेरबंद

कवठे येमाई, ता. 1 नोव्हेंबर 2019: शिरूर तालुक्‍यातील कवठे येमाई येथे चोरट्यांनी ज्येष्ठ दांपत्याला मारहाण करत दोन ठिकाणी दरोडा टाकत 73 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पाच दिवसांनंतर पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले आहे.

नूरमहंमद पठाण व पत्नी जैतूनबी पठाण यांना मारहाण करत त्यांच्याकडील सोने व रोकड लंपास केले होते. त्यानंतर प्रकाश गणाजी इचके यांच्या घरातून खिडकी तोडून सोने व पैसे लंपास केले होते. ऐन दिवाळीच्या सणात पडलेला हा दरोडा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. भरत भोर यांच्या दूध संकलन केंद्रांत चोरीचा प्रयत्न केल्याने ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते. यानंतर देखील शनिवारी (ता. 26) कवठे येमाई गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ग्रामीण पथक व शिरूर पोलिस स्टेशन यांनी तपास सुरू केला होता. पुणे व नगर जिल्ह्यातील गुन्हेगार असल्याचा संशय त्यांना होता. त्यामुळे या पथकाने सापळा रचून अविनाश ऊर्फ आवड्या सादीश काळे (वय 24, रा. वाळूंज पारगाव) व निघोज (ता. पारनेर) येथील परेश ऊर्फ पऱ्या नरेश काळे यांना ताब्यात घेतले आहे.


वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड, दत्तात्रेय गिरीमकर, पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे, उमाकांत कुंजीर, राजू मोमीन, जनार्दन शेळके, संजय साळवे, अक्षय जावळे, धीरज जाधव, शिवाजी कावडे, महेश आव्हाड यांनी तपास केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या