वाघाळे ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. लवांडे यांचा सत्कार

Image may contain: 8 people, people smiling वाघाळे, ता. 2 नोव्हेंबर 2019: "मतदान केलेले दाखवा आणि बिलात 20 टक्के सवलत मिळवा' हा वैद्यकीय सेवेचा विधायक उपक्रम राबविल्याबद्दल वाघाळे ग्रामपंचायतीतर्फे रांजणगाव गणपती येथील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व श्री गजानन हॉस्पिटलचे डॉ. अंकुश लवांडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

डॉ. लवांडे यांनी 21 ऑक्‍टोबरपासून हा उपक्रम राबविला असून, याचा लाभ रांजणगावसह परिसरातील विविध रुग्णांनी घेतला. वाघाळे गावातील अनेक रुग्णांनीही या उपक्रमाचा लाभ घेतला. त्याबद्दल डॉ. लवांडे यांचा गावात त्यांचा जाहीर सत्कार केला. या वेळी सरपंच अमोल धरणे, उपसरपंच दिलीप थोरात, पप्पू भोसले, बबन शेळके, संदीप धायबर, सचिन शेळके, शरद धायबर व ग्रामस्थ उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान व्हावे, यासाठी रुग्णांना बिलात, तसेच विविध साथींच्या आजारांच्या रुग्णांना रक्त तपासणीसाठीच्या फीमध्ये 20 टक्के सवलत देण्याचा विधायक उपक्रम डॉ. लवांडे यांनी त्यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये राबविला. "मतदान केलेले दाखवा आणि 20 टक्के सवलत मिळवा', या त्यांच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या