...अन तब्बल १९ वर्षांनी मिळाला जुन्या आठवणींना उजाळा

Image may contain: one or more people, people standing and outdoorरांजणगाव गणपती,ता.५ नोव्हेंबर २०१९(प्रतिनीधी) : ..तोच वर्ग..तेच मिञ पुन्हा मिञांच्या गर्दीने भरुन गेलेला वर्ग असा योग तब्बल १९ वर्षांनतर अनुभवायला मिळाला तो रांजणगाव गणपती(ता.शिरुर) येथील मंगलमुर्ती विद्याधाम येथे.

Image may contain: 11 people, people smiling, people standing and beardनिमित्त होते रांजणगाव गणपती(ता.शिरुर) येथील मंगलमुर्ती विद्याधाम येथे दहावी च्या २००१ च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे.या निमित्त तब्बल १९ वर्षानंतर दहावीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रथमच एकञ आलेले होते.जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी भारावुन गेले होते.अभ्यास न केल्याने शिक्षकांनी दिलेला मार,एकमेकांच्या केलेल्या खोड्या,विद्यार्थ्यांनी केलेली मस्ती अशा आठवणी या वेळी विद्यार्थ्यांनी जाग्या केल्या तर माजी विद्यार्थिनींनीही एकमेकांची आतुरतेने विचारपुस केली. तर तेव्हा केलेल्या चुका मान्य करत आपल्या भावनांना वाट करुन दिली.

Image may contain: 6 people, people smiling, indoorया वेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मंगलमुर्ती विद्याधाम प्रशालेस ई-लर्निंगची गरज ओळखुन ५५ इंची एलईडी संच भेट म्हणुन देण्यात आला.तर शाळेस वर्गखोली बांधण्याचे आश्वासन श्रीकांत पाचुंदकर अॅड.विकास कुटे यांनी दिले.
यावेळी मुख्याध्यापक एस.जे वेताळ, जे.एन.जोशी, डी.बी. भुजबळ, एम.पी.बनकर, एन.के.व्यवहारे, एस.डी.भोगावडे, एम.पी.बनकर, अशोक शेळके, टी.आर.फंड, एन.जी.अनारसे या शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत विविध क्षेञात नाविन्यपुर्ण काम करणा-या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Image may contain: 2 peopleया स्नेहमेळाव्यास ,किरण शिंदे, संदिप खेडकर, कानिफनाथ पाचुंदकर,रामचंद्र पाचुंदकर, राहुल पवार,अतुल मंडलकर,मारुती नरवडे, सचिन मैंद, तान्हाजी फंड,संतोष खेडकर, प्रिती अनारसे, उज्जवला खेडकर, मोहिनी  खेडकर, यामिनी नरवडे, जनाबाई शेलार, मनिषा गाडेकर, छाया शेळके, विद्या खेडकर नंदा शेळके, विजया चिखले, शोभा लांडे,नामदेव लांडे,संदिप पाचुंदकर, योगेश लांडे, सुभाष खेडकर, साईनाथ दरवडे, विरेंद्र कोठारी, भाऊसाहेब दरवडे, महेश कोल्हे, चंद्रकांत लांडे, भाउसाहेब दरवडे, भाउसाहेब जगदाळे, संदिप शेळके, दिनेश देवकर, कमल अभंग, सरिता बांदल, वैशाली जगदाळे, रेणुका फंड, रेणुका लांडे, छाया नरवडे, सोनाली टाकळकर, भारती कोल्हे आदी उपस्थित होते.

Image may contain: 5 people, indoorया कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.उर्मिला खेडकर यांनी केले, सुञसंचालन अॅड. विकास कुटे यांनी केले व आभार भारती दरवडे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. उर्मिला खेडकर,सारिका खेडकर,भारती दरवडे, अॅड.विकास कुटे, अॅड.सुरेश शेळके, श्रीकांत पाचुंदकर यांनी परिश्रम घेतले.

Image may contain: 5 people, people smiling, people standing

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या