शासकीय कामामुळे महिनाभर तलाठी कार्यालय बंद

तळेगाव ढमढेरे, ता. ६ नोव्हेंबर २०१९ (जालिंदर  आदक): येथील कामगार तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय गेल्या महिनाभरा पासून कार्यालय बंद असून नागरिकांची गैरसोय होत आहे. शिरूरच्या तहसिलदार लैला शेख यांनी शासकीय कामानिमित्त तलाठी आणि मंडल अधिकारी येत नसल्याचे सांगितले आहे.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आणि इतर कामासाठी नागरिकांना तलाठ्याचे गेल्या महिन्यापासून दर्शन होईनासे झालेसारखे आहे. यामुळे नागरिकांची पंचनाम्या व्यतिरिक्त बँकेची कामे खोळंबली असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. निवडणुकीच्या  पुर्वीपासून या कार्यालयात शेतकरी चकरा मारत आहे परंतु कामगार तलाठी जाग्यावरच नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तळेगाव ढमढेरे हे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असुन या गावात दुय्यम निबंधक कार्यालय असल्याने मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असते. गावामध्ये प्रत्येक वेळेस तलाठी आणि मंडल अधिकारी यांची गरज भासते.  यानिमित्ताने नागरिकांना विविध कामांसाठी सातबारे विविध प्रकारचे दाखले,गरजेचे असतात यासाठी नागरिक कामगार तलाठी यांना फोन केल्यास फोन उचलत नसल्याच्या तक्रारीचा पाढा नागरिकांनी वाचला आहे.

तसेच पूर्वीचे मंडलाधिकारी तसेच कामगार तलाठी यांची बदली होऊन गेल्यापासून नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या दाखला किंवा सातबारे मिळाले नसल्याची खंत तळेगाव ढमढेरेचे माजी उपसरपंच गणेश तोडकर यांनी केली आहे याबाबत नागरिकांच्या तोंडी तक्रारी असून त्यामध्ये कामगार तलाठी यांनी लवकरात लवकर कार्यालयात यावे आणि आणि नागरिकांची पिळवणूक थांबवावी अश्या मागणीला जोर आहे.

याबाबत शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांच्याशी संपर्क साधला असता शासकीय कामासाठी निवडणुकीपासून तलाठी आणि मंडल अधिकारी तळेगाव ढमढेरे येथे शेती नुकसान भरपाईच्या पंचनामेसाठी कामात आहेत सर्व कर्मचारी अधिकारी कामानिमित्त बाहेर असतात त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत माजी उपसरपंच गणेश तोडकर म्हणाले शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाई नोंदवन्यासाठी शेतकरी गेले असता  कार्यालयात तलाठ्यांची भेटच होत नाही मग शासकीय कामानिमित पंचनामे कोणाचे करता असा संतापजनक सवाल तोडकर यांनी केला. शेतकर्‍यांच्या पिळवणुकीला शासकीय अधिकारी जबाबदार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या