माजी सैनिक मारहाण प्रकरणाचा योग्य तो तपास करावा...

Imageशिरूर, 10 नोव्हेंबर 2019 (संपत कारकूड): माजी सैनिक भरत घावटे व त्यांच्या आईला झालेल्या मारहाणीच्या तपासात जाणीवपूर्वक वेळ घालवून आरोपीला जामीन मिळण्यासाठी व इतर बचावासाठी स्पेस तयार केला असल्याचा आरोप करून या प्रकरणी पुन्हा चौकशी करून योग्य तो तपास करावा, अशी मागणी समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी एका पत्रकाद्वारे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे.

एकेकाळी देशाचे रक्षण केलेल्या सैनिकावरच अशी वेळ आली आहे कि त्याला गुन्हा दाखल झाल्यापासून आकरा महिन्यात असंख्य चकरा मारूनही काहीच तपास केला नाही. या गुन्ह्यातील आरोपी हे समाजात आदर्श व प्रतिष्टीत समजले जाणारे शिक्षक व डॉक्टर पेशातील आहेत. त्यांना वाचविण्यासाठी आत्तापर्यंतचा वेळ का दवडला? अशी शंका आत्तापर्यंतच्या तपासावरून घेतली जात आहे.

मारहाणीचा व्हिडीओ हा सर्वात मोठा पुरावा असतानाही शिरूर पोलिसांकडून तपासास का विलंब लावला जात आहे? यासह अनेक प्रश्न यानिमित्त निर्माण झाले आहेत. शिरूर पोलिसांकडून ताबडतोब पुढील कारवाही करून तपास पूर्ण करावा अशी मागणी समस्त हिंदू आघाडीने केली आहे.


माजी सैनिक मारहाण प्रकरणाचा तपास संथगतीने?
शिरूर, ता. 9 नोव्हेंबर 2019 (संपत कारकूड): अकरा महिन्यांपूर्वी सरदवाडी (ता. शिरूर) येथे राहणारे माजी सैनिक भरत घावटे व त्यांच्या वृद्ध आईला जबर मारहाण करून जीवे मारण्याच्या घटनेचा तपास शिरूर पोलिस स्टेशनकडून अद्याप पूर्ण झाला नसल्यामुळे माजी सैनिकाने तापास यंत्रणेवर संशय व्यक्त केला आहे.

९ जानेवारी २०१९ रोजी आपल्या मालकी हक्काच्या जागेवर वाद निर्माण करून सैनिक श्री. घावटे व त्यांच्या वृद्ध आईला जबर मारहाण करण्यात आली होती. यामध्ये सैनिकाच्या आईच्या चार बरगड्या तुटल्या होत्या. प्रथमता: किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल केलेल्या या घटनेत वैदकीय अहवाल आल्यानंतर पुढील गुन्हे दाखल केले गेले. अकरा महिन्यात तीन वेळा घटनेतील कलम वाढविण्यात आले. परंतु, त्याप्रमाणात तपास मात्र जागेवरच आहे. 

दरम्यान, गेल्या अकरा महिन्यात तीन वेळा येथील पोलिस निरिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. नुकतेच रुजू झालेले पोलिस निरिक्षक प्रवीण खानापुरे हे तपास पूर्ण करणार का ? असा सवाल घावटे यांनी उपस्थित केला आहे.
(क्रमश:)


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या