पुणे-नगर मार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुचवा

शिरूर, ता. 10 नोव्हेंबर 2019: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैरान झाले आहे. मोठ्या प्रमाणातील इंधन खर्चाबरोबरच चालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांचा बहुमुल्य वेळ वाया जात आहे.

वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्या जात आहेत. यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. योग्यवेळी उपचार न होऊ शकल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. शिवाय, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहेत.

पुणे-नगर प्रवास म्हटले की नको रे बाबा... अशा प्रतिक्रिया उमटताना दिसतात. शिक्रापूर व वाघाली ही दोन्ही गावे वाहतूककोंडीसाठी प्रसिद्ध झाली आहेत. वाहतूक कोंडीबाबत www.shirurtaluka.com ने अनेकदा बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. शिवाय, वाचकांकडून प्रतिक्रियाही मागितल्या आहेत. पुणे-शिरूर प्रवासासाठी किती वेळ लागेल? असे विचारले असता दोन तासांपासून ते एक दिवस असे नेटिझन्सनी सांगितले आहे. यावरूनच वाहनचालकांचा मनस्ताप दिसून येतो.

दरम्यान, पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात? आपणच उपाययोजना ठरवूयात. तर प्रतिक्रियांच्या माध्यमाध्यमातून जरूर व्यक्त व्हा...


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या