उच्चदाब ग्राहकांनी ऑनलाईन वीजबील भरताना घ्यावी खबरदारी

मुंबई, ता. ११ नोव्हेंबर २०१९ (प्रतिनिधी): महावितरणच्या पुणे येथील एका उच्चदाब वीजग्राहकाची बनावट ई-मेलद्वारे बँकेचे बनावट खाते क्रमांक व इतर माहिती कळवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

महावितरणच्या व्यवस्थापनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी सायबर क्राईम,शिवाजीनगर पोलीस स्टेशन,पुणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.खबरदारीचा उपाय म्हणून सर्व उच्चदाब ग्राहकांना महावितरणने ई-मेलद्वारे कळविले आहे.

सर्व उच्चदाब ग्राहकांना आरटीजीएस माध्यमातून वीजबील भरण्यासाठी महावितरणच्या एस बँक व एसबीआय बँकेचा तपशील वीजबिलावर देण्यात येतो. यामध्ये लाभार्थी (Beneficiary) खातेधारक MSEDCL आहे. तसेच एस बँकेचा लाभार्थी खाते क्रमांक MSEDCL ने सुरू होतो व एसबीआयचा लाभार्थी खाते क्रमांक MSEDHT  ने सुरू होतो.  या सर्व बाबींची खात्री करूनच उच्चदाब ग्राहकांनी आपले वीजबील RTGS द्वारे भरावे,असे आवाहन महावितरणने केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या