Viral: शिवसेनेची अवस्था विक्रम लॅंडर सारखी झाली...

शिरूर, ता. 12 नोव्हेंबर 2019: राज्यात सरकार स्थापनेवरून गोंधळ निर्माण झाला असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जोक्स व्हायरल होताना दिसत आहेत.

राज्यपालांनी जर कोणत्याच राजकीय पक्षाला सरकार स्थापन करण्यास दिलच नाही तर त्या अभिजित बिचकुलेला संधी द्यायची का ?? 😅
राज्यपाल बंगल्यावरील साखर आणि चहापत्ती संपली.
- सुत्रांची माहीती😂😂

शिवसेनेची अवस्था विक्रम लॅंडर सारखी झाली...
शेवटी शेवटी संपर्क तुटला...
🤣🤣🤣

आता राज्यपालही mpsc परीक्षा घेऊन नियुक्त करण्याची वेळ आली आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी
आपले ग्रुप ॲडमिन .......
राज्यपालांच्या भेटीला ........🤔🤔🤔🤔.......
45ग्रुप सदस्य घेऊन
. सत्ता स्थापनेचा दावा करण्याकरता
. स्वतः मुख्यमंत्री👑
. बाकीच्या सदस्यांचे लवकरच मंत्रीपद वाटप
. टीप . सर्वांनी एडमिन च्या संपर्कात रहावे 😂😂😂😂
45 जण मंत्री होऊ शकतात.

मागच्या दोन दिवसात लोकांना दोन गोष्टीची माहिती मिळाली...
आपले राज्यपाल कोण व ग्रुप एडमिन कोण..
.😆😜😄

सकाळच्या ११ वाजेपासून टीव्ही समोर बसलेलो आहे...
उठायला लागलो की टीव्ही अँकर आताची मोठी बातमी म्हणून परत खाली बसवतात...😜

शिवसेनेची अवस्था वर्ल्ड कप मधील न्यूझीलंड सारखी झाली आहे
डकवर्थ लुईस नुसार काही जमतयं का बघा...😅😜

मातोश्री वर लगीन घाई
बारामतीकर झाले हौशी
इटलीची मॅडम होणार म्हणे
आता वाघांची मावशी
उद्धव म्हणे सोनियाला
ओवाळ मला ताई
तुझ्या भाच्याला झाली
सीएम व्हायची घाई
धीर धर दादा जरा
आदु होईल आता सीएम
राहुल ला माझ्या तू
कधी करणार पिएम्
धीर धर जरा तू
प्रसंग आहे बाका
हे सगळे खेळ खेळतो
बारामतीचा काका


एक हाती सत्ता द्या, असे राज ठाकरे का म्हणतात हे आज कळाले
सरकार स्थापना आहे कि दहीहंडी ?
काही समजत नाही राव 🙄
जो येतोय तो सलामी देऊन जातोय 😜😅😂
बऱ्याचजणांनी भाजपचं सरकार गेलं म्हणून फटाके वाजवले होते.
#आता म्हणत आहेत की #तुळशीचं_लग्न होतं

पुढच्या काही दिवसात बिचुकले लाही आमंत्रण येऊ शकते
हँग झालाय महाराष्ट्र😳

वाघ आहे नी ,कमळ आहे,
आत्ता सगळं अंमळ आहे,
त्यांची बुध्दी आपल्यापेक्षा,
खूप जास्त प्रबळ आहे.

आपण उगाच हळवे होऊन,
सगळे धागे शिवत असतो,
Counting  नंतर त्यांच्यासाठी,
आपण  सारेच वजा असतो .

ते तेव्हाच सोडुन देतात,
शाई लागलेले आपले बोट,
 आपण उगाच खुळ्यासारखे,
धरून बसतो आपलेच वोट.

भांडतो, तोडतो जिवाभावाचे,
विनाकारण  सगळे बंध,
नागरिका मधला मतदार,
डोळे मिरवणारा असतो अंध.

त्यांची भांडणे, त्यांच्या गळामिठी,
सगळेच त्यांच्या सत्तेसाठी.
आपण उगाच बधिर होऊन,
डोळे विस्फारून बघत बसतो.
त्यांच्या मधला मेलेला "माणूस"
EVM मधून हसत असतो.

चेंडू राष्ट्रवादी च्या कोर्टात आहे आणि साहेब आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत!
खेळ पाहण्यासारखा.
सुपरओव्हर सुरु🎊⏰⏰

गेले १५ दिवस संजय राऊत जी फाईल घेऊन मिडीया समोर फिरत होते,
त्यात १७५ जणांची यादी नसून आधीच्या अँजिओग्राफीचे रिपोर्ट होते.
😜😜😂

कार्यकर्त्यांना अख्खं राजकारण एकाच निवडणुकीत समजवुन घेण्याची सुवर्णसंधी 😂

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या