Photo: शिरूरच्या साहिल बांदल कडून तैलबैला सुळका सर

Image may contain: 2 people, people smiling, mountain, sky, outdoor and nature
शिरूर, ता. 14 नोव्हेंबर 2019: येथील साहिल बांदल या युवकाने लोणावळा लगत असलेला सुमारे 250 फूट उंचीचा अत्यंत अवघड मानला जाणारा तैलबैला हा सुळका राईट फ्रंट या अवघड बाजूने विक्रमी वेळेत सर केला. या मोहिमेमध्ये साहिल समवेत मुंबई, हरियाणा व गुजरात चे 4 गिर्यारोहक होते.

तैलबैला हा सुळका पुणे जिल्ह्यातील लोणावळा जवळील तैलबैला गावाजवळ स्थित आहे. तैलबैला हा प्रस्थरारोहणाच्या दृष्टीने अत्यंत अवघड मानला जातो.
हा सुळका सर करण्यासाठी प्रस्थरारोहणाचे चार मार्ग असून त्यापैकी समोरील बाजूची चढाई अत्यंत अवघड आहे. साहिल व त्याच्या टीमने ही अवघड बाजूची चढाई विक्रमी वेळेत पूर्ण करून माथ्यावर आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत असलेला तिरंगा फडकवला. या मोहिमेत मुंबई येथील मॅक मोहन यांनी लीड क्लाइंबिंग केले. गुजरात येथील संविद पांचाल व हरियाणा येथील वरून मेहता यांनी बीलेयर चे काम केले.

साहिल हा गिर्यारोहण क्षेत्रात कामगिरी करत असून, त्याने नुकतेच आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो सर केले आहे. या शिखरावर भारताचा सर्वात लांब तिरंगा फडकवण्याचा विश्वविक्रम साहिलने प्रस्थापित केला आहे. साहिलने बेसिक व ऍडव्हान्स मौन्टीनीरिंग त्याचप्रमाणे बेसिक रॉक क्लाइंबिंग हे कोर्स 'अ' श्रेणी सह पूर्ण केले आहेत. यापुढेही अनेक मोहिमांचे नियोजन केले असून लवकरच युरोप खंडातील सर्वोच्च शिखर 'माऊंट एलब्रूस' सर करणार असल्याचे साहिलने सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या