पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारून पळाला पण...

शिक्रापूर, ता. 14 नोव्हेंबर 2019: पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून तिचा खून केला. पत्नीचा खून झाल्यानंतर घराला कुलूप लावून पळून गेला. पण, पोलिसांनी अखेर त्याला पकडाच.

प्रेमसिंग देवराम पटेल (रा.पानंद, जि.खंडाळा, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. प्रेमसिंग याने चारित्र्याचा संशय घेवून मिडगुलवाडी (ता.शिरूर) येथील राहत्या घरात पत्नीचा खुन करुन मुलाबाळांसह पसार झाला होता. परप्रांतिय प्रेमसिंग पटेल याला शिक्रापूर पोलिसांनी नगर जिल्ह्यातील विसापूर येथून अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, मिडगुलवाडी (ता. शिरूर) येथील एका पोल्ट्रीवर आरोपी प्रेमसिंग देवराम पटेल (रा.पानंद, जि.खंडाळा, मध्यप्रदेश) हा आपली पत्नी माया पटेल व एक लहान मुलगा सोबत राहत होता. पत्नीवरील चारित्र्याचा संशयावरून त्याने झालेल्या भांडणावेळी पत्नीला काठीने मारहाण करीत तसेच तिचे डोके भिंतीला आपटून खून केला. यानंतर त्याने लहान मुलाला सोबत घेवून पळ काढला. याबाबत पोल्ट्रीमालक अमोल ज्ञानेश्वर मिडगुले यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशनला माहिती दिली होती.

पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळूंखे यांनी आरोपीचा मागोवा घेत तो विसापूर (ता. श्रीगोंदा, जि.अ.नगर) येथे असल्याचे समजल्यावर सहाय्यक फौजदार मधुकर खिल्लारे, निखिल रावडे, नीरज पिसाळ, विकास मोरे आदी पथमासमवेत जावून त्याला तिथेच ताब्यात घेतले. प्रेमसिंग पटेल याला शिरुर न्यायालयात हजर केला असता त्याला न्यायालयाने 15 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या