राज्यस्तर स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू कौतुक सोहळ्याने भारावले


Image may contain: 11 people, people sitting and outdoor
देवदैठण,ता.१५ नोव्हेंबर २०१९ (प्रा . संदीप घावटे): श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेच्या खेळाडू शुभांगी वाखारे ,वैष्णवी वाघमारे,अनिकेत साठे यांची महाराष्ट्र राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल त्यांचा गुणगौरव करण्यात आला. लक्ष्मीकांत दंडवते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुणगौरवामुळे खेळाडू भारावून गेले .
     
पुणे विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत शुभांगी वाखारे  हिने १९ वर्ष वयोगटात लांब उडी व तिहेरी उडीत प्रथम क्रमांक मिळवला.तसेच वैष्णवी वाघमारे हिने या स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात तिहेरी उडीत प्रथम तसेच लांब उडीत तृतीय क्रमांक पटकावला.माजी विद्यार्थी अनिकेत साठे याने १९ वर्ष वयोगटात क्रॉसकंट्री स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला .या सर्व खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचा कौतुक सोहळा व शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता .

तसेच यावेळी विभाग स्तरापर्यत खेळाडू निकिता कोरके,वेदीका धावडे तसेच क्रीडा शिक्षक संदीप घावटे यांचाही सन्मान करण्यात आला .सातारा येथे १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तर शालेय मैदानी स्पर्धेसाठी यावेळी मान्यवरांनी मनोगतातुन शुभेच्छा दिल्या.वसंत बनकर,अतुल लोखंडे,सर्जेराव कौठाळे,प्रकाश बाफना,लक्ष्मीकांत दंडवते यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी क्रीडा शिक्षक संदीप घावटे यांजकडून प्रत्येक खेळाडूस २५०० रु प्रकाश बाफना यांजकडून ११०० रु बक्षीस देण्यात आले .शाळेकडून खेळाडूंचा राज्यस्तरीय स्पर्धेचा सर्व खर्च केला जाणार आहे.शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुकुमार बोरा,उपाध्यक्ष चंद्रकांत बाफणा,सचिव तु. म .परदेशी , सहसचिव बाबासाहेब चोरमले यांनीही खेळाडूंना संदेश रूपाने शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजया नितनवरे यांनी केले.आभार प्रदर्शन मच्छिंद्र बनकर यांनी केले .

    या कार्यक्रमासाठी लक्ष्मीकांत दंडवते ,  मुख्याध्यापक संभाजी शेळके , शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र भटेवरा , शाळा समिती सदस्य प्रकाश बाफणा ,माजी सरपंच मंगल कौठाळे , युवा नेते  अतुल लोखंडे , हिंगणीच्या  सरपंच जयश्री वाघमारे , तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष वसंत बनकर, सर्जेराव कौठाळे,पत्रकार दिपक वाघमारे,ग्रामपंचायत सदस्य रविंद्र ढवळे,विजय कोकाटे,संदीप भोलकर,नरेंद्र दंडवते व खेळाडूंचे पालक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या