शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा...

Image may contain: 25 people, crowd

शिरुर,ता.१६ नोव्हेंबर २०१९ (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील चासकमान प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील जमिनीचे चुकीच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेतील अनागोंदी कारभाराविरोधात शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गेली अठ्ठावीस वर्षापासून पुनर्वसनाचा प्रश्न सतावत असून पुणे जिल्ह्यात असलेल्या ७ धरणातील प्रकल्पग्रस्तांच्या अनियमित जमीन वाटपातील शेकडो प्रकरणांच्या न्यायासाठी एकत्र येत लढा उभारत असून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने शिरूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

पुणे जिल्ह्यातील वीर, भामा-आसखेड, उजनी, टेमघर, गुंजवणी, कळमोडी व चासकमान या सात धरणांच्या प्रकल्पग्रस्तांसाठी शिरूर तालुक्यात एकट्या चासकमान लाभक्षेत्रातील जमिनीचे सुमारे ३५६८ हेक्टर क्षेत्रांचे संपादन करून त्यातील काही क्षेत्राचे वाटप करण्यात आले,वाटप झालेल्या क्षेत्राबाबत अनेक शेतकऱ्यांच्या पश्च्यात हि वाटप प्रक्रिया झाली असून अनेक शेतकऱ्यांवर या वाटप प्रक्रियेत अन्याय झाला आहे. तसेच शेतकऱ्यांना वाटपा बाबत नेमकी आकडेवारी समजू दिली जात नाही. असंख्य अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची सध्या याबाबत न्यायालयात तसेच महसूल विभागाकडे लढाई सुरु असून अनेक वाटप घोटाळे सुरु असल्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले आहे, असे डॉ. धनंजय नामदेव खेडकर यांनी सांगितले

शेतकऱ्यांच्या प्रमुख तक्रारी...
 १)चुकीचा स्क्रॅब अकारणी करून  भूसंपादन
२) चुकीची संयुक्त मोजणी
३) संयुक्त मोजणी प्रत्यक्ष झालीच नाही
४) भूसंपादन  मंडळ व अधिकारी यांच्या चौकशी अहवालास केराची टोपली.
५) एकाच खात्यातील दोन  वेगवेगळी  भूसंपादन प्रकिया दाखवून स्लॕब पेक्षा जास्त क्षेत्राचे भूसंपादन
६) हरकती असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबदला न घेताच जिल्हाधिकारी यांचे नाव ७/१२ वर दाखल
७) महाराष्ट्र जमिनीचे तुकडेबंदी व तुकडेजोड यांचे एकत्रीकरण अधिनियम 1947 ची पायमल्ली करून भूसंपादन.

याविषयी पुनर्वसन अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले पुनर्वसन जमिनीचे व्यवहारांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसून शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील तर त्या शेतकऱ्यांनी समोर येऊन मांडाव्यात आपण त्यावर चर्चा करून मार्ग काढू. पुनर्वसनासाठी झालेल्या चुकीच्या भूसंपादन प्रक्रीयेमुळे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या आजाच्या हिशोब आंदोलनाला शिरुर तालुका मनसेने  देखील पाठींबा दिला. याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करुन तालुक्यातील सर्व प्रलंबीत प्रकरणांसह संशयित प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी मनसे कडून करण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या