Video: बैलगाडा शर्यत सुरू झाल्या पाहिजेत: अमोल कोल्हे

Image may contain: 2 people, people smiling, people sitting, phone and indoorशिरूर, ता. 20 नोव्हेंबर 2019: महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती पुन्हा चालू झाल्या पाहिजेत, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शून्य प्रहरात लावून धरली.

बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांचा आवडीचा खेळ असून शेतकरी मुलांप्रमाणे बैलांवर प्रेम करतात. देशी गाईंचा वंश टिकवून ठेवण्यासाठी बैलगाडा शर्यत सुरू होणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील अर्थकारणही त्यावर अवलंबून असते. असा मुद्दा डॉ. कोल्हे यांनी सभागृहात लावून धरला.

सभागृहातून बाहेर पडल्यानंतर लगेचच त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्रश्न म्हणून विशेष लक्ष घालण्याचीही त्यांनी यावेळी विनंती केली. मंत्री जावडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुढील आठवड्यात आवश्यक ती माहिती घेऊन या संदर्भात पुन्हा भेटण्याचे आश्वासन दिले आहे, असे डॉ. कोल्हे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शिरूर लोकसभा निवडणूकीदरम्यान बैलगाडी शर्यतीचा मुद्दा प्रचारादरम्यान चर्चेत आला होता. यावेळी डॉ. कोल्हे यांनी निवडून आल्यास बैलगाडी शर्यत सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या