देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

Image may contain: 1 person, standingमुंबई, ता. 23 नोव्हेंबर 2019 : राजकारण हे नेहमीच बेभरवशाचे असते, हे सिद्ध झाले असून, राज्यात भारतीय जनता पक्ष (भाजप) व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राजभवनात आज सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी गुपचूप शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तर भाजपला संपूर्ण राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला आहे की, अजित पवारांसोबत आमदारांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

"विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आले नव्हते. शेतकऱ्यांसह राज्य अनेक अडचणींचा सामना करत होते. गेल्या महिनाभरापासून चर्चा संपतच नव्हत्या. त्यामुळे स्थिर सरकार बनवण्यासाठी हा निर्णय घेतला," अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी शपथविधीनंतर राजभवनात दिली.

अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याबद्दल आभारी : देवेंद्र फडणवीस
"मला पुन्हा राज्याची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आभारी आहे. युतीला चांगला जनादेश मिळाला होता. पण शिवसेनेने आमची साथ सोडून दुसऱ्या पक्षासोबत गेली. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. अशा परिस्थितीत सरकार बनू शकतं नव्हतं. स्थिर सरकार देण्यासाठी अजित पवारांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राज्याला आम्ही स्थिर सरकार देऊ. राज्यातील आव्हानांना आम्ही चांगल सामोरं जावू," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

काँग्रेसची टीका...
अजित पवार यांच्या या निर्णयाने काँग्रेस नेत्यांना धक्का बसला आहे. त्यांना या सगळ्याची कल्पना नव्हती. काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीची रात्री बैठक झाली. पण त्याला अजित पवार नव्हते. लाज वाटावी असं राजकारणं त्यांनी केलं, असं ते म्हणाले.
दरम्यान, शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दोन्ही नेते उत्तम काम करतील याची खात्री आहे, असं पंतप्रधानांनी दिली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या