'पुनर्वसन जमीन वाटप प्रकरणाच्या चौकशीचे आदेश'

Image may contain: 12 people, people sittingतळेगाव ढमढेरे, ता. 26 नोव्हेंबर 2019 (आकाश भोरडे) : शिरूर तालुक्यातील शेकडो एकर पुनर्वसन शेतजमिन वाटपात गैरव्यवहार झाला असून, बनावट दस्तऐवज तयार करून जमिनींचे वाटप झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करत चौकशी अहवाल ७ दिवसांत सादर करण्याचे आदेश पुनर्वसन विभागीय आयुक्त साधना सावरकर-खारकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी निमगाव म्हाळूंगीतील छावा प्रतिष्ठानचे तेजस यादव आणि शिरूर तालुक्यातील पुनर्वसन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांना निवेदन देत मागणी केली होती. शिरूर तालुक्यात प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जमीन वाटप करताना त्या जमिनींचे बेकायदेशीररीत्या हस्तांतरण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व त्यांना मदत करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार चौकशीचे आदेश देण्यात आलेले असून, त्यात या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करा, असे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान छावा प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी (ता. २०) दुपारी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'गोट्या खेळो' आंदोलन करण्यात आले. यावेळी छावा प्रतिष्ठानचे तेजस यादव यांसह शिरूर तालुक्यातील स्वप्निल दरेकर, प्रकाश सोनवणे, विकास बांगर, मोहन नरके, प्रवीण बांगर, सुहास चौधरी, संतोष झांजे, गणेश मोरे, विशाल बांगर, राहुल हिंगे, बाळू रणपिसे, तुषार लवंगे यांसह इतर शेतकरी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या