Video: मेजर विश्वास हरिश्चंद्र भोसले अमर रहे...

Image may contain: 1 person
निर्वी, ता. 29 नोव्हेंबर 2019 : दिल्ली येथे कार्यरत असलेले सेंट्रल इंडस्ट्रीयल स्पेशल फोर्सचे (सीआयएसएफचे) जवान मेजर विश्वास हरिश्चंद्र भोसले (वय 42) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जवान भोसले हे गेल्या महिन्यात दिवाळीनिमित्त सुट्टीला आले होते. त्यानंतर ते ग्रामदैवत बालेशा यात्रेला उपस्थित होते. एक आठवड्यापुर्वीच ते सुट्टी संपवून दिल्ली येथे रुजू झाले होते. बुधवारी (ता. 27) रोजी सकाळी निवास्थानी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. सहकाऱ्यांनी त्यांना दवाखान्यात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांच्या मुत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दिल्ली येथून त्यांचा मृतदेह विमानाने पूणे येथे आणल्यानंतर त्यांना शासकीय जवानांकडून मानवंदना देण्यात आली. गुरुवारी (ता. 28) दुपारी त्यांच्या निर्वी गावी ग्रामस्थांनी फुलांनी सजवलेल्या ट्रॅकटरवर भोसले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यादरम्यान गावातील महिलांनी ठिकठिकाणी रांगोळी काढून भोसले यांना आदरांजली वाहिली. अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विदालयातील विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, मेजर विश्वास भोसले अमर रहेच्या घोषणा दिल्या. दरम्यान, भोसले यांना लहानपणापासून सैन्यात जायची आवड होती. भोसले यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या