Video: वाघाळे येथील शेतकरी वीजेचे उपोषण यशस्वी...

Image may contain: 7 people
वाघाळे, ता. 6 डिसेंबर 2019:
चार दिवस दिवसा, तर तीन दिवस रात्रीच्या वेळी थ्री फेज वीजपुरवठा केला जाईल, या लेखी पत्रकाद्वारे मागणी मान्य केल्यावर वाघाळे (ता. शिरूर) येथील माजी सरपंच तुकाराम भोसले यांनी उपोषण सोडले. महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

शिरूर तालुक्‍यातील महावितरण कंपनीच्या विरोधात सोमवारी (ता. 2) वाघाळे येथे माजी सरपंच तुकाराम भोसले हे उपोषणास बसले होते. त्यांना गावातील महिलांनी पाठिंबा दिला होता. बिबट्या व विषारी सापांमुळे शेतकऱ्यांना शेतात रात्रीचे पाणी देता येत नाही. महावितरण शेताला लागणारी थ्री फेज वीज रात्री देते. दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. 27 नोव्हें.) संबधित महावितरण कार्यालयाला दिली होती.

केडगावचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी चार दिवस दिवसा, तर तीन दिवस रात्रीच्या वेळी थ्री फेज वीज दिली जाईल, असे लेखी पत्रकाद्वारे कळविले. त्यानंतर महावितरणचे साहाय्यक अभियंता संतोष पंचरास यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन भोसले यांनी उपोषण मागे घेतले. या वेळी पोलिस हवालदार नानासाहेब काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

वाघाळ्यातील महिलाही विजेसाठी आक्रमक...
Image may contain: 9 people, people smiling, people standing and outdoor
वाघाळे, ता. 4 डिसेंबर 2019: वाघाळे (ता. शिरूर) येथील माजी सरपंच तुकाराम वसंत भोसले यांनी "महावितरण'विरोधात उपोषण आंदोलनास सुरुवात केली असून, आज (बुधवार) तिसरा दिवस आहे.

गावातील महिलांनी पाठिंबा दिला असून, समस्या सुटली नाही; तर लवकरच या महिला महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहेत. वाघाळे परिसरात बिबट्या व सापांमुळे शेतकऱ्यांना शेतात रात्रीचे पाणी देता येत नाही. मात्र महावितरणकडून शेतासाठी थ्री फेज वीजपुरवठा रात्री केला जातो. त्यामुळे या भागात दिवसा थ्री फेज वीजपुरवठा करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी 27 नोव्हेंबर रोजी महावितरण कार्यालयाला कळविली होती. याबाबत तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. संबंधित अधिकारी या भागात फिरकले नाहीत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी माजी सरपंच तुकाराम भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू केले आहे. गावातील महिला एकत्रित आल्या आहेत. शेतातील पाणी भरण्याची कामे रात्रीची करावी लागतात. दिवसादेखील बिबट्याची भीती आहे, असे येथील विठाबाई पवार, नंदाबाई तांबे, ज्योती थोरात, सुमन बांगर, सुप्रिया बढे, अलका थोरात यांनी सांगितले.

Image may contain: 8 people, people sittingदरम्यान, "महावितरण'चे शिक्रापूरचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन व सहायक अभियंता संतोष पंचरास यांनी उपोषणकर्ते तुकाराम भोसले यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. तसेच राज्यातील भारनियमन हे वरिष्ठ कार्यालयातून ठरविले जाते. ग्रामपंचायतीचे मागणीपत्र घेऊन वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. नागरिकांच्या समस्यांचा विचार केला जाईल. त्यामुळे उपोषण सोडावे, असे केडगावचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या