रांजणगावच्या उपसरपंचावर खंडणीचा गुन्हा दाखल

No photo description available.
रांजणगाव गणपती , ता. 5 डिसेंबर 2019: रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील उपसरपंच राहुल पवार व तीन साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरात चर्चेला उधान आले आहे.

रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये कामाचा ठेका मिळवण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी यूकेबी कंपनीचे व्यवस्थापक कुलदीप रवींद्रकुमार यादव (रा. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

उपसरपंच पवार याच्यासह नीलेश फंड, बालाजी नवले व रणजित काळे या चौघांनी कंपनीच्या गेटवर सुरक्षारक्षकाला मारहाण करून यादव यांच्या केबिनमध्ये घुसून ठेक्याची मागणी केली. शिवाय, 50 हजार रुपयांची खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. चौघांनी यादव यांच्या मोबाईल व लॅपटॉपचेही नुकसान केले आहे. शिवाय, चौघे जण यादव यांना मारहाण करत असताना कंपनीचे मालक आयुष तायल व मनुष्यबळ विकास अधिकारी विकास मोरे त्या ठिकाणी आले असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, रांजणगावच्या उपसरंपचावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त शिरूर तालुक्यात वेगाने पसरले असून, चर्चेला उधान आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या