विकासकाम नक्की कोणाचे? आजी की माजी आमदाराचे...

Image may contain: 2 people, people smiling, eyeglasses and closeupशिरूर, ता. 9 डिसेंबर 2019: पुणे-नगर रस्त्यावरील वाघोली येथे रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामाचे श्रेय नक्की कोणाचे? यावरून आजी-माजी आमदारांबरोबरच शिरूर तालुक्यात चर्चेला उधान आले आहे.

माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी ट्विटरवरून म्हटले आहे की, 'मी केलेली विकासकामे कोणत्याही श्रेयासाठी केली नव्हती. ती जनतेसाठी केली होती. मात्र, आमच्या विकासकामांवर निवडून आलेले विरोधक आमच्याच कामांचे फोटो टाकून श्रेय घेण्याचा जो प्रयत्न करत आहेत. हा प्रकार नक्कीच हास्यास्पद आहे. नविन सरकारने एकही काम मंजूर केलेले नाही.'
आमदार अशोक पवार यांनी फेसबुक पेजवर म्हटले आहे की, 'सध्या वाघोली हे गाव ट्राफिक समस्यांमध्ये गुदमरत आहे, रोड वरून जाणाऱ्या नागरिकांना ट्राफिकच्या समस्या नेहमीच भेडसावत असतात त्यावर मात करण्यासाठी रस्ता रुंदीकरणाला तातडीने वेग देण्यात आला आहे. वाघोली येथील वाघेश्वर मंदिर व सातव हायस्कूल जवळील रस्ता रुंदीकरणाचे व साईट पट्ट्याचे काम प्रगतीपथावर असून यामध्ये कामाची गुणवत्ता कशी राखली जाईल, वाघोलीची वाहतूक सुरळीत कशी होईल व ट्राफिक मधून नागरिकांना कशी सुटका मिळेलयासाठी आपण पूर्ण प्रयत्न करीत आहोत.'


दरम्यान, दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियावरून कामाच्या श्रेयाबाबत पोस्ट टाकल्यानंतर www.shirurtaluka.com ने मतचाचणी घेतली. यावर नेटिझन्सनी मत नोंदवतानाच प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत. यामुळे तुम्हीच ठरवा, कामाचे श्रेय नेमके कोणाचे...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या