अपघात होऊनही दिव्यांगी लांडेचा राष्ट्रीय स्पर्धेत डंका

Image may contain: 1 person, smiling, standing
देवदैठण, ता.९ डिसेंबर २०१९ (प्रा . संदीप घावटे ): केडगाव ( अहमदनगर ) येथील दिव्यांगी कृष्णा लांडे या खेळाडुने राष्ट्रीय  शालेय मैदानी स्पर्धेत ४x१०० मीटर रिले स्पर्धेत रौप्यपदक तर  १०० मीटर  व २०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांकासह कांस्यपदक पटकावून अहमदनगरचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकवले आहे.

पंजाब राज्यातील  सुगुर  येथे  सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करताना १४ वर्ष वयोगटात  तीने १२ .९ सेकंद  वेळ नोंदवत १०० मीटर धावणे स्पर्धेत  कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत ती २०० मीटर धावणे स्पर्धेतही तीने कांस्यपदक मिळवले. तर ४ X१०० मीटर रिले स्पर्धेत तिच्या संघाने रौप्यपदक पटकावले. या तिच्या  कामगिरीमुळे अहमदनगरचे नाव राष्ट्रीय स्पर्धेत गाजले आहे.

अहमदनगर येथील उद्धव ऍकेडमी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये ती सातवी इयत्तेत शिकत आहे .ट्रॅक रेसर्स स्पोटर्सचे मार्गदर्शक दिनेश भालेराव व ऐश्वर्या कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगी वाडीया पार्क येथे दररोज सराव करते. वडील कृष्णा लांडे हे देखील कबड्डीपटू होते.या अगोदर दिव्यांगीने अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.या यशाबद्दल छत्रपती पुरस्कार विजेते रंगनाथ डागवाले,छत्रपती पुरस्कार विजेते सुनिल जाधव,पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, प्राचार्या निशिगंधा जयंत जाधव,नगर तालुका क्रीडा समिती प्रमुख महेंद्र हिंगे,विजयसिंह मिस्कीन यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

"शिरूर तालुका डॉट कॉम" शी बोलताना दिव्यांगीचे मार्गदर्शक दिनेश भालेराव म्हणाले की अहमदनगर येथील वाडीया पार्कचा ट्रॅक जर सिनथेटीक ट्रॅक बनला तर नगरमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील.सिनथेटीक ट्रॅक साठी प्रयत्न होणे गरजेचे आहे .
    
दैव बलवत्तर म्हणून .....
दिव्यांगी तिचे आईवडील व लहान भाऊ हे सर्वजण पुणे येथील विभागीय मैदानी स्पर्धा आटोपून अहमदनगर येथे परतीचा प्रवास करत असताना जातेगाव घाटात त्यांच्या चारचाकी गाडीला अपघात होऊन गाडीने दोन पलटी घेतल्या होत्या. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून या गुणवान खेळाडू दिव्यांगीसह कुटूंबीय या मोठया अपघातातुन सुखरूप बचावले. पण सर्वांनाच प्रचंड मानसिक धक्का बसला होता.पण या धक्यातून दिव्यांगीने स्वतःला सावरत सातारा येथील शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत सहभागी होऊन १०० मीटर व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत  दुहेरी सुवर्णपदक मिळवले होते व आता राष्ट्रीय स्पर्धेत पदकांची लयलुट करताना ट्रिपल धमाका करत यशाचे शिखर गाठले आहे.ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या