रांजणगाव देवस्थानने मंदिरातील दगडी फरशा का काढल्या?

रांजणगाव गणपती, ता.११ डिसेंबर २०१९ (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी एक असलेले रांजणगाव गणपती हे नावाजलेले तीर्थक्षेत्र आहे. येथील मंदिराची वास्तु पेशवेकालीन असुन माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा ढाच्या उभारला असल्याचे जाणकार सांगतात. आजपर्यंत अनेक व्यक्तींची या ट्रस्टवर विश्वस्त म्हणून नेमणूक झाली आहे. परंतु कोणत्याही ट्रस्टच्या विश्वस्ताने मंदिराचा हा मुळ पेशवेकालीन ढाच्या हलवण्याचे काम केले नाही. परंतु सध्या पदावर असलेल्या विश्वस्थानी याच महागणपती मंदिराच्या आवारात पेशवेकालीन दगडी फरश्या काढल्या असल्याचे निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्रात असलेल्या अष्टविनायकांपैकी रांजणगाव येथे चौथा गणपती आहे आणि या गणपतीला महागणपती असे संबोधले जाते. श्री महागणपती देवस्थानचा जीर्णोद्धार माधवराव पेशवे यांनी केल्याची नोंद इतिहासात आढळते.तसेच त्यांनी मंदिर परिसरात दगडी बांधकाम केल्याचे इतिहासात पुरावे आढळतात.तसेच मंदिरातील सभामंडपाचे बांधकाम इंदूरचे सरदार किबे यांनी केल्याचा उल्लेख आढळतो.तसेच मंदिराचे नूतनीकरण त्यांनी केल्याचे आढळते.

देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिरातील पेशवेकालीन दगडी फरश्या कोणाच्या परवानगीने काढलया तसेच पेशवेकालीन वास्तूंशी छेडछाड करण्याचा अधिकार ट्रस्टीना आहे का... ? पेशवेकालीन ढाच्यात बदल करताना देवस्थान ट्रस्टने पुरातत्व विभागाची परवानगी घेतली आहे का... ? असा प्रश्न नागरीक उपस्थित करत असून, ऐतिहासिक वास्तुंची डागडूजी करताना रांजणगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांना तसेच ग्रामस्थांनाही विश्वासात घेतले नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. याबाबत देवस्थानचे अध्यक्ष ऍड विजयराज दरेकर यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता. त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या