शिरूर तालुक्यातील दोन मातांना 'आदर्श माता' पुरस्कार

Image may contain: 1 person, smiling, standingशिरूर, ता. 14 डिसेंबर 2019: चिंचोशी-गोकुळनगर (ता. खेड) येथे दत्तजयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात स्मिता सूर्यकांत पलांडे व शमीम तांबोळी यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्मिता पलांडे या शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव पलांडे यांच्या मातुःश्री आहेत; तर शमीम तांबोळी छत्तीसगडमधील जिल्हाधिकारी अय्याज तांबोळी यांच्या मातुःश्री आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते दोघींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या वेळी आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, शंकर जांभळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव पलांडे, श्‍यामराव पलांडे, नगरसेवक संतोष शेवाळे, किरण बनकर, उद्योजक रवींद्र भुजबळ आदी उपस्थित होते.

या वेळी वळसे पाटील म्हणाले, "जिद्द, चिकाटी, मेहनत व गुणवत्तेच्या जोरावर शेतकऱ्यांची मुले आता उच्च पदापर्यंत गेली आहेत. आगामी काळात गुणवत्ता व दर्जाला महत्त्व असून उच्चशिक्षणाकडे पालक व विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.''

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या