ऋषिकेश तुकाराम गवारे IMA-145 परिक्षेत उत्तीर्ण

Image may contain: 3 people, people smiling, people standing and outdoorविठ्ठलवाडी, ता. 14 डिसेंबर 2019: श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथील ऋषीकेश तुकाराम गवारे हे IMA-145 परिक्षा उत्तीर्ण झाले असून, ते भारतीय सैन्य दलात लेफ्टनट या पदावर रुजू होणार आहेत.

Image may contain: 1 person, smiling, standing, hat, beard and outdoorऋषीकेश यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) परीक्षेत यश मिळविले होते. 2016 मध्ये 135व्या तुकडीसाठी निवड झाली होती. तीन वर्ष चिकाटीने खडतर प्रशिक्षण पुर्ण करून ते उत्तीर्ण झाले. गवारे यांचे शिक्षण पुणे येथे झाले असून, त्याच्या घरातील लष्करी शिस्त असल्यामुळे त्यालाही भारतीय सैन्यदलात काम करण्याची तीव्र इच्छा होती. त्यांचे वडील ले. कर्नल तुकाराम बबन गवारे यांनी भारतीय सैन्यामध्ये अधिकारी पदावर सेवा केली आहे. शिवाय, आपल्या सेवेच्या काळात अनेक खडतर ठिकाणी आपला पदभर स्वीकारून कामगिरी पार पडली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून येथील परीक्षा घेतली जाते. ऋषीकेश यांनी आपले आजोबा बबन गवारे यांच्याकडून शिस्तबद्धता, एकी, जिद्द व चिकाटीची प्रेरणा घेतली आहे. आजी लक्ष्मी गवारे यांच्याकडून अपार कष्ट, खरे वागणे, आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची शिकवण घेतली आहे. आई भाग्यश्री यांनी त्यास संस्काराचे धडे दिले. ऋषीकेश यांनी लहानपणापासूनच सैन्यदलात अधिकारी होण्याचे मनात ठाम केले होते. त्यासाठी त्याने अपार कष्ट व मेहनत घेतली. तीन वर्षांचे एनडीएचे खडतर शिक्षण घेतले.

ऋषीकेश तुकाराम गवारे हे IMA-145 परिक्षा उत्तीर्ण झाले असून, ते भारतीय सैन्य दलात लेफ्टनट या पदावर रुजू होणार असल्याने परिसरामधून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या