थेट सरपंच निर्णयाबाबत होणार पुनर्विचार: अजित पवार

पुणे, ता. 15 डिसेंबर 2019: थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष आणि बाजार समितीचा संचालक निवडण्याच्या निर्णयांबाबत पुनर्विचार केला जाईल आणि पूर्वीप्रमाणे बहुमताच्या आधारे सरपंच, नगराध्यक्षांची निवड केली जाईल, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता. १४) केले.

पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समितींच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नावे निश्‍चित करण्यासाठी पवार यांनी संवाद साधला. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आमदार दत्तात्रेय भरणे, अशोक पवार, अतुल बेनके, सुनील शेळके उपस्थित होते.


जिल्हा परिषद व पंचायत समितीवर कारभारी बनण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. अनेकांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली; पण गुणवत्ता, पक्षासाठी केलेल्या कामाच्या आधारेच नव्या कारभाऱ्यांची नावे निश्‍चित केली जातील, असेही पवार म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या