Video: कढईतील उकळत्या पाण्याचे रहस्य...

Image may contain: 1 person, foodशिरूर, ता. 16 डिसेंबर 2019: उकळत्या पाण्यामध्ये मुलगा बसला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित होत असले तरी खरी परिस्थिती जाणून घेतल्यानंतर आभारही मानत आहेत.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर कढईत उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसलेल्या मुलाचा व्हिडिओ शेअर होतोय. जणू चमत्कार असल्यासारखं त्याच्या भोवती भाविकांचा गराडा आहे. या प्रकाराची पोलखोल करणारी एक पोस्ट सध्या फेसबुकवर शेअर होताना दिसत आहे.

फेसबुकवर संभाजी भोसले नावाच्या एका युजरने उकळत्या पाण्यात ध्यानस्थ बसलेल्या मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. परंतु, हा व्हिडिओ कुठे आणि कधी शेअर केला याबाबतची माहिती नाही. पण, व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स आश्चर्यचकित होत आहेत. पण, खरी परिस्थिती वेगळीच आहे. अशी फसवणूक कोणाचीही होऊ शकते. त्यामुळं प्रत्येकजण दुसऱ्याला जागरूक करू लागलाय. पाटील यांनी व्हिडिओ शेअर करताना त्याच्याबरोबरच एका मराठीत या प्रकाराचं स्पष्टीकरण देणारी पोस्टही शेअर केलीय. दोन स्वतंत्र कढईच्या माध्यमातून ही फसवेगिरी होते, असे संभाजी पाटील यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मुलगा बसलेली कढई आणि धग असलेली कढई यांच्यात थोडी जागा (गॅप) असते. बसलेल्या कढईत पाण्याला उकळताना येतात तसे बुडबुडे आणण्यासाठी हवेची एक पाईप जोडलेली असते. पाण्यात फुलं टाकलेली असतात त्या फुलांच्या गर्दीत ती पाईप दिसत नाही. पाणी उकळत असल्याचे दिसत असल्यामुळे कोणी त्यात हात घालून बघत नाही आणि हवेचे बुडबुडे आलेल्या पाण्याला उकळी येत असल्याचे दिसते.

दरम्यान, संभाजी पाटील यांनी आकृतीसह या फसवेगिरीचा भांडा फोड केल्यामुळे नेटिझन्सनी त्यांचे आभार मानले आहेत. अनेकांनी हा प्रयोग कुठे करण्यात आला आहे, याबद्दलची माहिती विचारली. काहींचा अशा प्रकारावर विश्वास असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी संभाजी पाटील यांच्या स्पष्टीकरणाला आक्षेप घेतला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या