'आयुष्याला वन्समोअर नाही; जीवन सार्थकी लावा'

Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoorराष्ट्रीय व्याख्याते पंकज महाराज गावडे  यांचे मार्गदर्शन
जातेगाव बुद्रुक, ता. 19 डिसेंबर 2019: 'आयुष्याला वन्समोअर नाही; म्हणून जीवन सार्थकी लावा. विद्यार्थ्यांनी दुसऱ्यासाठी जगावे, समाज तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. स्वतःमध्ये बदल घडवत राष्ट्र बदलण्याचा ध्यास ठेवा. हा संकल्प केल्यास स्व. अतुल पवार यांच्या स्मृती चिरंतर जतन राहतील, असे मत राष्ट्रीय व्याख्याते पंकज गावडे यांनी येथे व्यक्त केले.

मौजे जातेगाव बु. (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे विद्या संकुलात स्व. अतुल सदाशिव पवार यांच्या स्मृतीदिना निमित्ताने शिरूर तालुक्यातील गुणवंत मान्यवरांचा सन्मान, रक्तदान शिबीर, "चला बदलूया, राष्ट्र घडवूया" अशा विविध उपक्रमांचे आयोजन करणेत आले होते.


Image may contain: 10 people, people smiling, people standing
यावेळी आदर्श माता-पिता पुरस्काराने सौ व श्री स्मिता आणि सुर्यकांत पलांडे, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाबाबत शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाषराव उमाप, युवा नेते किरण ढोकले, शिक्षण क्षेत्रातील कार्याबाबत सोमनाथ भंडारे, उत्तमराव भंडारे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, बालाजी शिक्षणसे संस्थेचे प्रमुख सदाशिव पवार, केशरताई पवार, पंचायत समिती सदस्या सविता पऱ्हाड, प्रमोद पऱ्हाड, बाजार समिती संचालक शंकरदादा जांभळकर, साधना जगताप, वंदना पवार, संस्था संचालक साहेबराव उमाप, दत्तात्रय उमाप, प्राचार्य रामदास थिटे, डॉ. ललीत इंगवले, अधिक्षक गजानन पाठक, सामाजीक कार्यकर्ते आबासाहेब पऱ्हाड, किशोर खळदकर, सुरेश इंगवले, वामनराव सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
Image may contain: 5 people, people smiling, people standing
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामदास थिटे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश बांगर यांनी तर आभार शंकर भुजबळ यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या