मध्यप्रदेशची अपहरण झालेली युवती पालकांच्या स्वाधीन

Image may contain: 10 people, people smiling, people standing and outdoor
शिक्रापूर, ता. २० डिसेंबर २०१९ (शेरखान शेख ): मध्यप्रदेश राज्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन युवतीचे एका युवकाने चार महिन्यांपूर्वी अपहरण केलेले असताना त्या ठिकाणी अपहरण बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.तर या घटनेला मध्यप्रदेशमध्ये गंभीर स्वरूप प्राप्त झालेले असताना स्वतः मध्यप्रदेश राज्यातील शिवणी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्वतः लक्ष घातलेले होते तर या अपहरण झालेल्या युवतीला पालकांच्या ताब्यात देण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून मध्यप्रदेश पोलिसांनी सदर युवतीला ताब्यात घेतले आहे.

लखनादौन (ता. लखनादौन) जि. शिवणी राज्य मध्यप्रदेश येथील प्रिती यादव या सोळा वर्षीय युवतीचे अपहरण झाले होते. याबाबत शिवणी पोलीस स्टेशन येथे अपहरणबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला असताना सदर युवतीचे छोटू उमाशंकर परहाना (रा. करणपूर) ता.लखनादौन जि. शिवणी राज्य मध्यप्रदेश याने अपहरण केले असल्याची बाब समोर आलेली होती.परंतु प्रिती व छोटू या दोघांचा देखील शोध लागत नव्हता दरम्यानच्या काळामध्ये मध्यप्रदेश राज्यातील या घटनेने वेगळे वळण घेतले होते.त्यामुळे शिवणी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्वतः या घटनेमध्ये लक्ष केंद्रित केले होते.यावेळी सदर युवतीला आरोपी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये घेऊन गेला असल्याची माहिती मिळाली.

त्यांनतर मध्यप्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने सदर युवतीचा शोध सुरु केला असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोघे असल्याची माहिती मिळाली त्यांनतर दोन वेळा युवतीला शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यात पोलिसांना यश आले नाही.परंतु त्यानंतर आज मध्यप्रदेश राज्यातील लखनादौन जि. शिवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन. पि. चौधरी,पोलीस हवालदार मनमोहन मिश्रा,धनेश्वर सिंग,महिला पोलीस साधना कुमारी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी,पोलीस नाईक,अनिल जगताप,अंकुश चौधरी,निखील रावडे यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे तळेगाव ढमढेरे भागातील विशाल विश्व जवळील एका घरातून दोघांना ताब्यात घेतले आणि मध्यप्रदेश पोलिसांसह प्रीती यादव या सोळा वर्षीय युवतीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे.यावेळी मध्यप्रदेश पोलिसांनी देखील शिक्रापूर पोलिसांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या