बारामतीत २६ ते २९ दरम्यान रोजी स्वयंसिद्धा युवती संमेलन

बारामती, ता.२१ डिसेंबर २०१९ (प्रतिनिधी): शारदाबाई पवार महिला महाविद्यालय (शारदानगर) येथे येत्या २६ ते २९ डिसेंबर दरम्यान ‘स्वयंसिद्धा युवती संमेलन’ होणार आहे. या संमेलनामध्ये राज्यातील अनेक महाविद्यालयातील युवती सहभागी होतात. सहभागी युवतींना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्राची ओळख व्हावी. यांच्यामध्ये सकारात्मक बदल व्हावा, पुढील आयुष्यात त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान द्यावे. या हेतूने "स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे"आयोजन करण्यात येते.

ज्या विद्यार्थिंनींना या युवती संमेलनामध्ये सहभाग घ्यायचा आहे. त्यांनी महाविद्यालयास फोन, ई-मेल करून सहभाग नोंदवावा.एका महाविद्यालयातून कितीही विद्यार्थिंनी सहभागी होऊ शकतात.राहण्याची व जेवणाची सोय महाविद्यालयाच्या वतीने केली जाणार आहे.या संमेलनासाठी प्रवेश शुल्क प्रत्येकी २०० रुपये  असून, सहभागी विद्यार्थिंनीस प्रमाणपत्र देण्यात येते. या संमेलनामध्ये “माझे महाविद्यालय तसेच आमच्या महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट उपक्रम” आणि “मी युथ आयकॉन माझी उत्कृष्ट कामगिरी” या दोन स्पर्धांचे आयोजन केले जाते.

गुरूवार दि. २६ रोजी दुपारी ३ वाजता या युवती संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या संमेलनास उद्घाटक म्हणून बारामतीचे डी.वाय.एस.पी.नारायण शिरगावकर, अध्यक्षा म्हणून सुनंदा पवार आणि विशेष अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ संतोष परचुरे हे लाभले आहेत.उद्घाटनंतरच्या सत्रात विद्यार्थिनींचा परिचय, संस्था परिचय व महाविद्यालयातील एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.

शुक्रवारी सकाळी सहभागी युवतींना शारदानगर परिसर दाखविला जाईल.याच दिवशी डॉ चारूलता बापये ‘विवाहपूर्व जीवन’ या विषयावर मार्गदर्शन करतील. डॉ अभिजित सोनवणे हे‘ भिक्षेकरी ते कष्टकरी’ या विषयावर आपले अनुभव कथन करतील. तसेच मीना नाईक या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करतील. सायंकाळी सहभागी युवती ‘माझ्या महाविद्यालयाचा सर्वाेत्कृष्ठ उपक्रमाचे’ सादरीकरण करतील आणि जेवनानंतरच्या सत्रात अविनाश सावजी मार्गदर्शन करतील.

शनिवारी पहिल्या सत्रात “मी युथ आयकॉन आणि माझी उत्कृष्ट कामगिरी“ या स्पर्धेचे सादरीकरण होणार आहे.त्यांनतरच्या सत्रात डॉ सुषमा भोसले यांचे ‘जाणीवा जागृत होताना, अरूंधती हुगेन यांचे ‘उद्योजकता’, त्यानंतर विक्रीकर निरीक्षक राजकुमारी पाटील यांची मुलाखत होईल.अभिषेक ढवाण ”Know & Grow your Brain“ या विषयावर विद्यार्थिंनींना मार्गदर्शन करतील.

रविवारी शेवटच्या दिवशी सकाळी शिबीरार्थी विद्यार्थिंनींची मनोगते होतील.त्यानंतर सुनंदा पवार आणि सविताताई व्होरा या विद्यार्थिंनींशी हितगुज, सुसंवाद साधणार आहेत.सकाळी ११:३० वाजता समारोपाचे सत्र सुरू होईल. या सत्रात राजेंद्र पवार, रोहित पवार, इंद्रजीत देशमुख हे विद्यार्थिंनींना मार्गदर्शन करतील.

विद्यार्थिंनींच्या व्यक्तिमत्वाला आकार यावा म्हणून या युवती संमेलनाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार,मुख्यकार्यकारी अधिकारी  निलेश नलावडे, प्राचार्य रा. बा. देशमुख यांनी २६ ते २९ डिसेंबर या काळात केले आहे.

या संमेलनाच्या संदर्भाने प्राचार्य रा. बा. देशमुख (९९६०२५९०६७) उपप्राचार्य ए.एस.कदम (८६०५३९०२०४) विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. आर.एस.लोहकरे (९८२२७३०५६४), प्रा.एस.एस. डांगे (९८६०५५४३९९) पी.व्ही.जाधव (९०९६१९११०४) संस्था समन्वयक श्री. पी. एस. तनपुरे (९४२२५१२१३२) यांना माहितीसाठी संपर्क साधू शकता.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या