पञकारास दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी

Image may contain: 8 people, people smiling, people standing and indoor

न्हावरे, ता. २१ डिसेंबर २०१९ (प्रतिनिधी): सध्या  कचऱ्यामुळे पसरत असलेल्या आजारांचा विचार करत आंधळगाव परिसरातील कचऱ्याच्या समस्येबाबत दैनिक प्रभातचे पञकार प्रमोल कुसेकर यांनी दि.११ डिसेंबर रोजी बातमी प्रसिध्द केली होती,तर त्या बातमीचा राग मनात धरून आंधळगावचे सरपंच नंदकुमार दाभाडे यांच्या पत्नी स्वाती दाभाडे यांनी प्रमोल कुसेकर यांच्या घरासमोर जाऊन कुसेकर यांना शिवीगाळ, दमदाटी करत  जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

यासंदर्भात  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे शिरूर प्रसिद्धीप्रमुख पत्रकार प्रमोल कुसेकर यांना आंधळगावचे सरपंच आणि त्यांच्या पत्नीने पत्रकार कुसेकर यांना ग्रामपंचायतची बातमी लावली याचा मनात राग धरून शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शेरखान शेख,सचिव अर्जुन बढे, पत्रकार अरुणकुमार मोटे, पत्रकार अप्पासाहेब ढवळे, पत्रकार सचिन धुमाळ, पत्रकार जालिंदर आदक, पत्रकार आकाश भोरडे, पत्रकार भगवान श्रीमंदिलकर आदी पत्रकार उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या