काय आहे नाताळ सणाचे महत्व...?

Image may contain: one or more people, people standing, christmas tree and outdoor
नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो.ख्रिसमस या दिवशी "येशू ख्रिस्त" यांचा जन्मदिवस म्हणून जगभर साजरा केला जातो.

पण बहुतेकांना हा येशू नावाचा व्यक्ती कोण आहे.आणि त्याचा जन्मदिवस का साजरा केला जातो.हे अजिबात माहिती नाही.तर काहींच्या मते येशू हे एक समाजसुधारक होते.ते एक तत्त्वज्ञानी होते.ते एक यहुदी शिक्षक होते.येशू हा अमेरिकेचा देव आहे किंवा येशू हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक आहेत.परमेश्वर प्रेरित पवित्र शास्त्रात आपल्याला त्याचे जीवन चरित्र वाचायला मिळते.त्यांचे जीवन अद्वितीय होते.आणि म्हणूनच नाताळ एक अद्वितीय सण आहे.प्रारंभी काळात देवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा ती परिपूर्ण होती.सगळीकडे आनंदी आनंद होता.असे असताना देवाने निर्माण केलेल्या आदाम व हव्वा या पहिल्या जोडप्याने देवाचे आज्ञा उल्लंघन केले.आणि परिणाम स्वरूप जगात पाप आले.या जगाला पापमुक्त करण्यासाठी सृष्टीच्या निर्माणकर्ता परमेश्वराने त्याच्या नेमलेल्या वेळी आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवल त्या पुत्राचे नाव होते.येशू अर्थातच प्रभू येशू यांचा जन्म योगायोगाने झाला.नसुन त्याचे पूर्व भाकीत करण्याचं आले होते.

यशया नावाच्या देवाच्या सेवकाने प्रभू येशू यांच्या जन्माच्या ७०० वर्ष आधी म्हटले पाहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानूएल असे ठेवील.या भविष्यवाणी प्रमाणे झाले.मरिया नामक एका इस्राएली कुमारिकेच्या पोटी येशूचा जन्म झाला.जन्माच्या ठिकाणाविषयी मिखा नावाच्या सेवकाने भविष्यवाणी केली होती.की बेथलहेम गावी येशूचा जन्म होईल आणि तसेच झाले.अशाप्रकारे कित्येक भविष्यवाण्या पूर्ण झाल्या.हा जन्म एक कल्पनिक कथा नसून सत्य घटना आहे.आणि या जन्मामुळेच आपली दिनदर्शिका एसविसन आणि इसवीसनपूर्व अशी दोन भागात विभागलेली आहे.या भारत देशात सर्व सण हे अन्य धर्मीयांचे लोक मोठया उत्साहाने साजरे करतात.म्हणून या भारत देशाला सणांचा देश असे म्हणतात.भारत देशात साजरे केले जाणाऱ्या सर्व सणांपैकी नाताळ हा एक ख्रिश्चन धर्माचा प्रमुख सण आहे.त्यावरून ख्रिश्चन श्रध्देनुसार हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमसस्टाईन नावाच्या पर्वाची सुरुवात झाली.ख्रिसमस किंवा नाताळ हा सण प्रारंभीच्या ख्रिस्त सभेत मुळीच अस्तित्वात नव्हता.खर पाहता पूर्वी येशू जन्माचा उत्सव मागील लोकांच्या आगमनापर्यत ६ जानेवारी या दिवशी साजरा केला जाई.ख्रिस्त सभेमध्ये तिसऱ्या शतकात आणि रोमन ख्रिस्त सभेमध्ये इ.स. ३०० च्या जवळपास नाताळ साजरा करण्यात येऊ लागला.रोम शहरात ही तारीख २५ डिसेंबर ठरवण्यात आली.मात्र इतर लोकांनी तो सण वेगळ्या दिवशी साजरा केला.रोममधील रोमन लोक सूर्याची देव म्हणून उपासना करतात.

२२ डिसेंबर नंतर सूर्याचे दक्षिणायन संपून त्याचे उत्तरायण सुरू होते.व त्या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात.रोमन लोकांच्या धार्मिक श्रध्देनुसार हा सूर्याचा जणू नवीन जन्म असतो.आपल्या देवाचा हा नवजन्म रोमन लोक मोठया आनंदाने साजरा करतात.कॉन्स्टस्टाईन या रोमन सम्राटाने याच सुमारास ख्रिस्ती धर्म स्वीकारला.त्याने ख्रिस्ती धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्याची उपासना न करता सुर्याचा निर्माता आणि नीतिसत्तेला सूर्य जो प्रभू येशू त्याची उपासना करणे सुरू केले.म्हणून २५ डिसेंबर हा दिवस रोमन कॅथॉलिक ख्रिस्त सभेला येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.जवळपास इ.स.३४५ वर्षात त्यावेळचा पहिला पोप ज्युलिअसने २५ डिसेंबर हा दिवस येशूचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला.त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला.जगात बऱ्याच ठिकाणी हा सण मध्यरात्री साजरा केला जातो.तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात.सर्वात प्रथम हा सण इ.स.पुर्व ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.सुर्यदेवाच्या वाढदिवसाला रोमन भाषेत नातलीक सोलीस इनइक्विटी म्हणजे अजिंक्य सुर्यदेवाचा वाढदिवस असे म्हणत.त्यावरून या उत्सवाला नाताळ असे नाव पडले.नाताळ हा ख्रिस्ती धर्मियांचा महत्त्वाचा सण असला तरी ख्रिस्ती धर्माच्या स्थापनेनंतर बरीच वर्षे हा सण साजरा करण्याची प्रथा पडलेली नव्हती.

मानवमुक्तीसाठी ख्रिस्ताने  स्वीकारलेला मृत्यू आणि त्याचे पुनरुज्जीवन या घटनांना पूर्वी अधिक प्राधान्य देण्यात येत होते.ख्रिस्ताच्या पुनरुज्जीवनाचा म्हणजेच ईस्टरचा सण तर अगदी प्रारंभापासून साजरा केला जात होता.तर रविवार हा प्रभुचा दिवस साप्ताहिक ईस्टर म्हणून साजरा केला जाई.मात्र नाताळ म्हणजे  ख्रिस्तजन्माचा सण साजरा केला जात नव्हता.ख्रिस्ताच्या मृत्यू नंतर जवळजवळ १०० वर्षांनी ख्रिस्तजन्माचा सण साजरा करण्याची कल्पना पुढे आली.तरी त्या वेळी फार थोड्या ठिकाणी हा सण साजरा होऊ लागला.तर चवथ्या शतकानंतर हा सण साऱ्या ख्रिस्ती जगतात साजरा होऊ लागला.पण चवथ्या शतकापर्यत ख्रिस्त जन्मदिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येत असे.इतर देशात डिसेंबर मध्ये तर अनन्य देशात जानेवारीत तर कुठे एप्रिलमध्ये हा सण साजरा होई.याला कारण म्हणजे ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला झाला याची माहिती कोणालाच नव्हती.त्या काळी जन्म तारीख नोंदवण्याची प्रथा नव्हती.यहुदी लोकांत तर जन्म दिवसाला अजिबात महत्व नव्हते.त्यामुळे जन्म दिवस साजरा करण्याचा प्रश्नच नव्हता.पहिले पोप व लिबेरिअस यांनी इ.स.३५३ ते ३५४ यावर्षी जगातील सर्व ख्रिस्ती धर्मीयांसाठी ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर निश्चित केली.

तर खरे पाहता २५ डिसेंबर या तारखेला पूर्वीचे मूर्तीपूजक लोक सुर्यदेवाचा सण साजरा करीत.दक्षिणेकडे गेलेला सूर्य परत उत्तरेकडे फिरताना थोडा वेळ स्थिर झालेला वाटे.तो दिवस हे लोक फार महत्त्वाचा मानत.सूर्यदेव आता पुन्हा प्रकाश घेऊन उत्तरेकडे परतणार म्हणून सूर्याच्या उत्तरायनाचा हा सण या दिवशी साजरा केला जाई. ख्रिस्त स्वतःच म्हणाला होता कि मी जगाचा प्रकाश आहे.म्हणुन ख्रिस्त लोकांनी नवप्रकाश देणाऱ्या ख्रिस्ताचा जन्म या दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली.म्हणून नाताळ हा सण नातूस म्हणजे जन्म ये लॅटिन  शब्दापासून बनला आहे.तर या शब्दाला इंग्रजी भाषेत ख्रिसमस म्हणतात.ख्रिसमस म्हणजे ख्रिस्त महायज्ञ.सहाव्या शतकात धर्मगुरुंना नाताळच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली.ख्रिस्ताच्या जन्म घटनेचे स्मरण करण्यासाठी पहिला मिस्त्रा मध्यरात्री अर्पण केला जाई.म्हणून ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला असे मानतात. ख्रिस्ताच्या जन्मापासून इ.स.सुरू झाले.याचा अर्थ १ जानेवारी इ.स. १ ला ख्रिस्ताचा जन्म झाला.मग २५डिसेंबर ला ख्रिसमस साजरा करतात हे कसे,असा प्रश्न अनेकांना पडतो.

याचे उत्तर असे की,ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा डायनसीअसचे चावले कॅलेंडर अस्तित्त्वात नव्हते.कारण ख्रिस्त जन्मानंतर ६०० वर्षांनी डायनसीअसने आपले कॅलेंडर बनवले.रोमन किंवा यहुदी लोकांची जी दिनदर्शिका त्याकाळी रूढ होती.त्यानुसार ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची नोंद कुणी केली नव्हती.ख्रिस्त जन्म झाला.त्या दिवसापासून १ जानेवारी इ.स.१असे मोजायला सुरुवात केली.असे नव्हे तर, ख्रिस्त जन्मानंतर ६००वर्षांनंतर इ.स.६ व्या शतकात डायनासीअसने गणिती पद्धतीने ख्रिस्त जन्माचा काळ ठरवला.आणि ख्रिस्त जन्म वर्षाला इ.स.१ असे मानून तेथुन पुढे ६०० वर्षांनी दिनदर्शिका त्याने गणिती पद्धतीने ठरवली. पण त्याने तारीख ठरवली नाही.पहिला पोप लिबेरिअस यांनी चवथ्या शतकात ख्रिस्ती धर्मीयांसाठी निश्चित केलेली ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर असणे शक्यच नव्हते.कारण तो पर्यत डायनासीअसचे कॅलेंडर तयार झाले नव्हते.तसेच रोमन लोक जो सुर्यदेवाचा सण साजरा करतात.तोही २५ डिसेंबर,असे जे वर्णनात आले आहे.ते वाचुन रोमन लोकांच्या काळात डायनासीअसचे इंग्रजी कॅलेंडर होते.खरे पाहता डायनासीअसचे इंग्रजी कॅलेंडर तयार होण्यापूर्वी दिनचक्र मोजण्याच्या रोमन व यहुदी दिनदर्शिका होत्या.परंतु त्यात फारच त्रुटी होत्या.

डायनासीअसने सहाव्या शतकात अधिक परिपूर्ण अशी दिनदर्शिका तयार केली.त्यानुसार पुढच्या व मागच्या काही घटनांच्या तारखा ठरविण्यात आल्या.या गणिती पद्धतीनुसार रोमन लोक सुर्यदेवाचा सण साजरा करीत.तो पहिले लिबेरिअस यांनी ख्रिस्त  जन्मोत्सवासाठी निश्चित केलेली तारीख इंग्रजी कॅलेंडरनुसार २५डिसेंबर असल्याचे निश्चित केले.म्हणून नाताळला भारतातील पत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना होते.या दिवशी चर्चमध्ये नेहेमीपेक्षा खुप मोठया प्रमाणात गर्दी असते.प्रत्येक पुरुष,स्त्री, लहान मुले सर्व कुटुंब नवीन कपडे घालून खुप उत्साहाने चर्चमध्ये येतात.भारतभर नाताळ या सणाला सार्वजनिक सुट्टी असते.नाताळ हा आफ्रिका,आग्नेय,आशिया,युरोप,अमेरिका अशा जगभरातील सर्व खंडांमध्ये व विविध देशांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो.तसेच बर्फ पडत असलेल्या प्रदेशात शुभ्र नाताळ उत्साहाने साजरा केला जातो. लहान मुले तर बर्फाचे तात्पुरते बाहुले तयार करतात.त्यांना युरोपातील ख्रिसमस बाजार असे म्हटले जाते.हे बाजात साधारणपणे नाताळाच्या अधिक चार आठवडे रस्त्यांवर सुरू होतात.दर आठवड्यांच्या शेवटी हे बाजार भारतात या कल्पनेची सुरुवात जर्मनीत मध्यभागात झाली.

डेट्रेन शहरात १४३४ मध्ये सुरू झाली. आता हा बाजार युरोप या देशात अधिक लोकप्रिय झाला आहे.हे बाजार जेथे ऐतिहासिक संग्राहालये आहेत.अशा ठिकाणी हे बाजार मोठया प्रमाणात भरतात.या बाजारात येशू संबंधित देखवे ही असतात.नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मीयांचा एक महत्त्वपूर्ण सण आहे.२५ डिसेंबर या दिवशी दरवर्षी येशूचा जन्म दिवस म्हणुन नाताळ हा सण साजरा करण्यात आला.परंतु काही ठिकाणी नाताळ २५ डिसेंबर ऐवजी ६,७ किंवा १९ जानेवारीला साजरा केले गेले. ख्रिश्चन लोक या सणाला फार महत्त्व देतात.ख्रिसमसचा शब्दशः अर्थ आहे.क्राइस्टक मास अर्थात येशूच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी प्रार्थना.आपल्यात अमावस्या,पैर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात.तशाच प्रकार इसवीसनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही.तिथे सूर्य भ्रमणालाच अधिक महत्त्व आहे.आणि २१ डिसेंबरला आपले सूर्य नेहमीपेक्षा थोडे कमीच वेळ दर्शन देत असतात.२१डिसेंबरचा दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस असतो म्हणजे त्या दिवशीची रात्र मोठी असते.त्यामुळे २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असणार.शिवाय हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्हणुन मानला जातो.

पण पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस ६ जानेवारी मानला जात असे.जवळपास साडे सोळाशे वर्षांपूर्वी त्या वेळच्या पोप महाशयांनी हा दिवस २५ डिसेंबर हा मानावा असा निर्णय दिला.म्हणून त्यांनी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस २५ डिसेंबर रोजी साजरा करावा असा नियम काढला.आणि त्या दिवसापासून हा सण २५डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला.जगभरातले सर्व ख्रिस्त अनुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात.साधू,संत,महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते.या दिवशी गिरीजाघरात पार्थना,कॅरोल्सचे गायन करण्यात येते.शुभ्र कार्डची देवाण घेवाण होते.ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदरपासूनच पार्थना व कॅरोल्सच्या गायनास सुरुवात करतात.संपूर्ण जगभरातल्या गिरीजाघरांमध्ये येशूची जन्मगाथा झाक्यांच्या रुपात प्रदर्शित केल्या जातात.२४ डिसेंबर च्या रात्री पासून आरती व पूजा पाठास सुरुवात होते.दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर ला जन्मदिनाचा सोहळा असतो.ख्रिश्चन बांधव या दिवशी खूप आनंदाने,उत्साहाने एक दुसऱ्याची गळाभेट घेवुन शुभेच्छांची आदान प्रदान करतात.नाताळ या सणाला धार्मिकते बरोबरच सामाजिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.परंतु देशातील आदिवासी आणि खेड्या पाड्यांच्या लोकांच मानपान,खानपान या दिवशी वेगळं असते.तांदळाच्या रव्यापासून बनवलेले केक व केळी हे यांच्या जेवणाचा एक महत्त्वपूर्ण भाग असतो.

आर्थिकरित्या संपन्न नसणाऱ्या घरात व्यंजन भेट म्हणून पाठविण्यात येते.दक्षिण भारतात काही भागात पायस वाटण्यात येते.परंपरावादी ख्रिश्चन लोकांसाठी हा सण पार्थना आणि आत्मशुद्धीचे कारण असते.म्हणुन रोमन कॅथॉलिक संप्रदायाचे लोक १ डिसेंबर पासुन २५ डिसेंबर पर्यत फक्त शाकाहारी भोजनाचेच सेवन करतात.जगाच्या बऱ्याच भागांमध्ये ख्रिसमस हा सण मध्यरात्री साजरा केला जातो. तर या धर्मतांचे काही अनुयायी काही पंथ हे मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी हा सण साजरा करतात.भारतीय धर्म संस्कृतीयांनी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विषय या २५ डिसेंबरशी निगडित आहे.ते म्हणजे प्राचीन काळात रोम राज्यात २५डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणुनही साजरा केली जात होती.नाताळ हा सण वर्षात सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण भगवान येशू यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. सर्व भारत देशामध्ये नाताळ हा सण २५ डिसेंबरला साजरा केला जातो.त्या दिवशी ख्रिसमस मोठया उत्साहात साजरा होतोच.पण तुला दिवशी वृक्ष सजावट देखील या सणाचा एक अविभाज्य भाग आहे.देवाचे पुत्र मानले जाणारे येशू प्रभूंच्या जन्माचा दिवस हा ख्रिश्चन लोकांसाठी मानला जातो. भगवान येशू हे होते.ज्यांनी लोकांना नवीन जीवन जगण्याची शिकवण दिली.तसेच त्यांनी सर्व दुःख आणि पीडितांपासून तारण केले असा विश्वास आहे.तेव्हा समाजामध्ये भगवान येशू यांचा जन्म झाला होता.तेव्हा समाजामध्ये लोभ,द्वेष, अंधश्रद्धा, हिंसा इ प्रथा रूढ होत्या.ईश्वराने लोकांना सत्याचा मार्ग दाखवण्यासाठी पाठविले होते.

जेणेकरून लोकांमधील अंधकार,अशांतता,दुःख आणि त्रास हे दूर करून लोकांना सत्याचा मार्ग दाखविला.येशूच्या जवळच्या लोकांनी जस की त्याच्या प्रेषितांनी आणि शिष्यांनी नाताळ सण साजरा केला होता का...?तसच बायबलच्या वाढदिवसा विषयी काय म्हणत...?या प्रश्नाची उत्तर मिळाल्यावर आपल्याला हे समजण्यासाठी मदत होईल की ख्रिश्चनांनी नाताळ हा सण साजरा करण योग्य आहे की नाही.त्यातील पहिली गोष्ट म्हणजे येशूचा किंवा देवाच्या इतर विश्वासु सेवकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असा उल्लेख बायबलमध्ये कुठेही सापडत नाही.ज्यांनी वाढदिवस साजरा केला होता.अशा फक्त दोन जणांबद्दल बायबल मध्ये सांगितले आहे.म्हणूनच प्रभू येशू यांची शिकवण अशी आहे की,इतरांना क्षमा करा,जो कोणी तुमच्या उजव्या गालावर मारतो.त्याच्याकडे दुसरा गाल करा,तुम्ही आपल्या वैर्यावर प्रीती करा.जे तुमचा छळ करतात,त्याच्यासाठी प्रार्थना करा.तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून, तुम्ही कोणाचे दोष काढू नका.जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो, त्याने आपल्या मनात तिच्याविषयी व्यभिचार केलाच पाहिजे.प्रभू येशूची ही अशी शिकवण आपल्याला नवा करार या पुस्तकात नक्की पाहायला मिळेल.

किरण दिपक पिंगळे, ७५०७८७१४८२
रांजणगाव गणपती

   
   
   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या