जि.प.सदस्य रेखा बांदल यांची अचानक भेट...

Image may contain: 2 people, people sitting
तळेगाव ढमढेरे,ता.२५ डिसेंबर २०१९ (जालिंदर आदक): तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील प्रथम श्रेणीमध्ये असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देऊन या गटातील जिल्हा परीषद सदस्या रेखाताई बांदल यांनी संबंधित पशुवैद्यकीय विभागातील तक्रारी जाणून घेतल्या.तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा याविषयी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना सुचना दिल्या.

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे सन १९२० पासुन पशुवैद्यकीय दवाखाना आहे.या परिसरातील अनेक गावातील पाळीव जनावरांना वेगवेगळ्या आजारांवर १०० टक्के लसीकरण देण्याचा प्रयत्न येथील पशुवैद्यकीय अधिकारी राजेंद्र त्र्यंबके आणि दवाखान्यातील कर्मचारी सतत करत असतात.या दवाखान्याच्या कामकाजाचा मासिक आढावा बैठक जिल्हा परीषद सदस्या रेखाताई बांदल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली यामध्ये दवाखान्याच्या अडीअडचणी विषयी चर्चा करण्यात आली.परिसरातील तळेगाव ढमढेरे,सणसवाडी,दरेकरवाडी,धानोरे,शिक्रापूर,राऊतवाडी,बुरुंजवाडी,कासारी,टाकळी भिमा,विठ्ठलवाडी या गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून औषधोपचार,खच्चीकरण,शस्त्रक्रिया,गर्भ तपासणी,वांझ तपासणी,कुत्रीम रेतण,नवीन जन्मलेली वासरांना लसीकरण या प्रकारे कामे केली जातात.

दुग्ध जनावरे आणि पाळीव प्राण्यांसाठी असणाऱ्या शासनाच्या सर्व योजनेंचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना व्हावा यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. तसेच जनतेच्या तुमच्या विषयी तक्रारी आमच्या पर्यन्त येऊन देऊ नका.शासनाच्या विविध योजनांचा फायदा शेतकऱ्यांना पुरेपूर मिळावा.आणि कृषि विभागाप्रमाणेच पशुपालकांची सहल काढण्यात यावी.अश्या अनेक सुचना जि.प सदस्या रेखा बांदल यांनी पशुवैधकीय अधिकारी यांना दिल्या.

   
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या