वाळु माफिया तुपाशी...मच्छीमार मात्र उपाशी

Image may contain: sky, ocean, outdoor, water and nature
शिंदोडी,ता.२६ डिसेंबर २०१९ (तेजस फडके): घोड धरणातील वाळु उपसा परत सुरु झाला असून वाळु माफिया पुन्हा सक्रिय झाले आहेत.घोड धरणात गेल्या अनेक वर्षांपासुन बेकायदेशीररीत्या बेसुमार वाळु उपसा चालु असुन घोड धरणातील दाणेवाडी येथे गेल्या अनेक दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या वाळु उपसा केला जात होता.दाणेवाडी येथे घोडधरणातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळुचे खड्डे पडले असुन या खड्यांमुळे नदीपात्राची अक्षरशः चाळण झाली आहे. दाणेवाडी नंतर वाळु माफियांनी पिंपळाचीवाडी,कुऱ्हाडवाडी येथे वाळुउपसा चालु केला होता.याबाबत "शिरुर तालुका डॉट कॉम" ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसुल खात्याने कारवाई करत सुमारे २१ बोटी फोडुन वाळुमाफियांवर कारवाई केली होती.

त्यानंतर काही दिवस घोड धरणातील वाळू उपसा बंद झाला होता.परंतु आता परत वाळु माफिया सक्रिय झाले असुन त्यांनी शिंदोडी येथे यांत्रिक बोटींच्या साह्याने वाळुउपसा चालु केला आहे.या बोटी श्रीगोंदा तालुक्यातील काही राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने चालु असल्याची परिसरात चर्चा आहे.गेल्या ८ दिवसांपासुन शिंदोडी येथील घोडधरणाच्या पात्रात श्रीगोंदा तालुक्यातील माठ आणि म्हसे या गावातील काही वाळु माफिया वाळु उपसा करत असुन वाळु खाली करण्यासाठी फायबर माठ किंवा म्हसे गावच्या हद्दीतील धरणाच्या कडेच्या जमिनीचा वापर करत आहेत.

शिंदोडी येथे गेल्या अनेक वर्षांपासुन काही मच्छिमार राहत असुन ते आपला उदारनिर्वाह घोडधरणात मासेमारी करुन करतात.परंतु गेल्या ६ महिन्यांपासुन घोड धरणात पिंपळाचीवाडी आणि कुऱ्हाडवाडी येथे चालु असलेल्या बेसुमार वाळू उपशामुळे मासेमारी करण्यास अनेक अडथळे येत आहेत.परंतु वाळु माफियांच्या दादागिरीमुळे नाईलाजास्तव त्यांना गप्प बसावे लागत होते.परंतु वाळु माफियांनी आता शिंदोडी येथे यांत्रिक बोटींच्या साह्याने वाळु उपसा चालु केल्यानंतर संतप्त झालेल्या मच्छिमारांनी गुरुवारी (दि २६) रोजी वाळु माफियांना नंदीपात्रातुन पिटाळुन लावले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या