आवाज दिल्याने तिने दरवाजा उघडला पण...

शिक्रापुर,ता.२८ डिसेंबर २०१९ (शेरखान शेख): शिक्रापूर (ता.शिरुर) येथील तळेगाव रोड परिसरात रात्रीच्या सुमारास घराचा दरवाजा वाजवून दरवाजा उघडला असताना अचानक दोघा अज्ञात व्यक्तींनी घरातील महिलेच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळून महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केले असल्याची घटना घडली आहे.

शिक्रापूर (ता.शिरुर ) येथील तळेगाव रोड परिसरात राहणाऱ्या भारती यादव या महिलेचे पती कंपनीत कामाला गेलेले असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोणीतरी दरवाजा वाजविला.यावेळी पती आले असावेत म्हणून महिलेने दरवाजा उघडला असता.अचानक दोघा अज्ञात व्यक्तींनी  महिलेच्या गळ्यातील ओढणीने महिलेचा गळा आवळून महिलेला खाली पाडले त्यांनतर महिलेच्या कानातील कर्णफुले व गळ्यातील काही दागिने काढून घेऊन पळून गेले. 

याबाबत भारती महेंद्र यादव रा.शिक्रापूर-तळेगाव रोड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट हे करत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या